शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांनी मिळाले पालकांचे छत्र

By admin | Updated: February 1, 2016 01:45 IST

वयाच्या अवघ्या दोन ते तीन वर्षांपासून बाल आश्रमात वाढलेल्या तीन मुलांना तब्बल १४ वर्षांनी पालकांचे छत्र मिळाले आहे. अनाथ म्हणून वाढत असलेल्या या

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईवयाच्या अवघ्या दोन ते तीन वर्षांपासून बाल आश्रमात वाढलेल्या तीन मुलांना तब्बल १४ वर्षांनी पालकांचे छत्र मिळाले आहे. अनाथ म्हणून वाढत असलेल्या या मुलांच्या पालकांचा शोध घेण्यात गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांच्या या प्रयत्नामुळे या मुलांचा वनवास संपला आहे.नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागामुळे सहा मुलांना पालकांचे छत्र मिळाले आहे. त्यापैकी तीन मुलांनी प्रथमच वयाच्या चौदा ते पंधराव्या वर्षी स्वत:च्या आई-वडिलांना पाहिले आहे. ही सर्व मुले दोन ते तीन वर्षांची असतानाच वेगवेगळ्या कारणाने बाल आश्रमात आलेली होती.राज्यात सध्या सुरू असलेल्या मुस्कान आॅपरेशनअंतर्गत गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस त्या ठिकाणी अनाथ मुलांच्या चौकशीसाठी गेले होते. यावेळी तेथील ११ मुले जन्मानंतर बाल आश्रमात कशाप्रकारे पोचली, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे, उपनिरीक्षक रुपाली पोळ व त्यांच्या पथकाने पुढील तपासाला सुरुवात केली. अनाथ म्हणून वाढत असलेल्या या मुलांच्या पालकांचा शोध घेण्याकरिता त्यांनी रायगडमधील त्या वादग्रस्त आश्रमाच्या देखील काही फायली हाताळल्या. त्यामध्ये मुंबईतील काही व्यक्तींची माहिती मिळाली. त्यांनीच या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून आणून त्या आश्रमात ठेवले होते. यानुसार तब्बल १२ ते १३ वर्षांनी प्रथम त्यांच्या घरी पोलीस धडकले. चौकशीत त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे एक एक धागा जोडत पोलिसांनी तीन मुलांच्या जन्मापासूनचा इतिहास उलगडला. कुटुंबातल्या अनेक घडामोडींमुळे ही मुले वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षीच पालकांपासून दुरावलेली होती. त्यापैकी काही मुलांच्या पालकांनी त्यांच्या मुलांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केलेला. परंतु रायगडच्या ज्या बाल आश्रमात ही मुले वाढत होती तो आश्रम विनापरवाना चालवला जात होता. यामुळे त्या मुलांची नोंदच पोलिसांकडे झालेली नव्हती. परंतु हे सर्व अडथळे दूर करीत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्या मुलांना पालकांची भेट घालून दिली. इतक्या वर्षांनी आपल्याला आई-वडील भेटत आहेत, यावर प्रथम त्या मुलांचा विश्वास नव्हता. मात्र प्रत्यक्ष भेटीत त्या मुलांनी पालकांच्या चेहऱ्याशी स्वत:चा चेहरा जुळवत आनंदाश्रू ढाळले. बालकल्याण समितीच्या सूचनेनुसार या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सध्या त्या बाल आश्रमाकडे असल्याने त्यांना पालकांच्या ताब्यात दिलेले नाही. मात्र महिन्यातून एकदा त्यांना भेटण्याची मुभा पोलिसांनी समितीकडून मिळवून दिली आहे, याचाच आनंद त्यांना गगनात मावेनासा झाला आहे.