शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या ‘पाणी’बाणीचे महासभेत उमटले पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:04 IST

शहरात सुरू असलेल्या पाणीसमस्येचे तीव्र पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येही उमटले. सद्य:स्थितीत प्रतिदिन ७० एमएलडी पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. पाणीसमस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

पनवेल : शहरात सुरू असलेल्या पाणीसमस्येचे तीव्र पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येही उमटले. सद्य:स्थितीत प्रतिदिन ७० एमएलडी पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. पाणीसमस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.शहरातील पाण्याच्या भीषण समस्येवर शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. याच विषयावर पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांनी लक्षवेधी मांडली. पीठासीन अधिकारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दोन्ही विषय मान्य करत सभागृहात या विषयावर चर्चा करण्यास परवानगी दिली. पाण्याच्या भीषण समस्येवर सत्ताधारी विरोधकांनी या वेळी एकत्र येण्याचे आवाहन नगरसेवक हरेश केणी यांनी केले.पाणीपुरवठ्यासंदर्भात धोरण तयार करण्यासाठी सिडकोला सोबत घ्या, अशी विनंती भाजपा नगरसेविका लीना गरड यांनी केली. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी, पनवेल महानगरपालिकेला दररोज २५० एमएलडी पाण्याची गरज भासते मात्र, सध्याच्या घडीला हा पाणीपुरवठा १८० एमएलडीच मिळत असल्याने एमजेपी, एमआयडीसी, तसेच सिडको प्रशासनाकडे जास्तीत जास्त पाण्याची मागणी करीत असल्याचे सांगितले. पनवेल महानगरपालिकेला नव्याने धरण बांधायचे असल्यास सुमारे १४०० ते १५०० कोटी खर्च येईल. याकरिता लागणार कालावधीही दहा वर्षांचा असेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेच्या मालकीचे आप्पासाहेब वेदक (देहरंग) व ओवे धरणातील गाळ काढण्यासाठी रॉयल्टी माफ करण्यात आल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. २४ तारखेपासून या कामाला सुरु वात करण्यात येणार असल्याने हे काम नेमके कसे सुरू होणार आहे, असा प्रतिप्रश्न अरविंद म्हात्रे यांनी उपस्थित केला. धरणातील गाळ नवी मुंबई विमानतळाच्या भरावाला वापरता येईल. याकरिता सिडकोशी चर्चा करण्याची सूचना त्यांनी केली. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पाण्याच्या गंभीर विषय विषयपत्रिकेवर का घेतला नाही, असा आक्षेप घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेने ५० टँकर देऊ करूनही आपल्याला त्याचा उपयोग करता आलेला नाही, तर १०० टँकर घेऊन काय फायदा होणार आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी, पाण्यासंदर्भात डीपीआर तयार करून तो राज्य शासनाकडे पाठविला जाईल, तसेच याकरिता खासगी एजन्सी नियुक्त करावी लागेल, असे सांगितले.नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या ५० टँकरचा पुरेपूर उपयोग घेता येईल, यासंदर्भात उपाययोजना राबविण्यात येतील. पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावण्याकरिता अमृत योजेनेचा डीपीआर लवकरात लवकर शासनाकडे पाठविण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील.- गणेश देशमुख, आयुक्त,पनवेल महानगरपालिका

टॅग्स :panvelपनवेल