शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलचा पारा ३८ अंशांवर

By admin | Updated: April 24, 2016 00:27 IST

पनवेलच्या बाजारपेठ सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेली असते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला

- अरूणकुमार मेहत्रे,  कळंबोलीपनवेलच्या बाजारपेठ सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेली असते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. दुपारी १२ च्या नंतर बाजारपेठेतील सर्व रस्ते ओस पडलेले दिसून येत असून, सायंकाळी ७ वाजल्यानंतर खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसून येत आहेत.गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा चढता असून, पनवेलचे तापमान सध्या ३८ अंशावर आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत असून, दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम आरोग्यावरही होत आहे.उन्हाचा कडाका वाढत असल्याने उष्णतेची लाटही वाढली आहे. दर वर्षी मेमध्ये जाणवणारा उन्हाचा कडाका यंदा एिप्रलच्या मिहन्याच्या सुरु वातीलाच जाणवू लागला आहे. मागील आठवड्यापासून तर तापमानात असह्य वाढ होऊन, ३७ ते ३८ अंशाच्या घरात तापमान जाऊन पोहोचले आहे.मे महिना सुरू होण्याआधीच एप्रिलमध्येच रणरणत्या कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे मे महिन्यात तर तापमानाचा पारा अधिकच वाढण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे. संध्याकाळीही वातावरणात उकाडा जाणवत आहे. कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत असल्याने बहुतांश नागरिक सकाळच्या सुमारासच महत्त्वाची कामे करायला प्राधान्य देताना दिसून येत आहे. एप्रिलच्या सुरु वातीपासूनच उष्णतेची प्रखरता जाणवू लागल्याने सर्दी, ताप, खोकला, घसा आदी आजारांच्या रु ग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. विशेष करून वाढत्या तापमानाचा परिणाम वृद्ध व बालकांवर होत असून, या रु ग्णांचीच संख्या रु ग्णालयांमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, उष्माघात टाळण्यासाठी भर उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते. शरीरातील दाहकता कमी करण्यासाठी लिंबू सरबत व इतर थंडपेय घ्यावीत. मात्र, अति थंड पदार्थ घेऊ नयेत. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच भर दुपारी घराबाहेर जाणे टाळावे. - डॉ. बी.एस. लोहारे, वैद्यकीय अधीक्षक, पनवेल ग्रामीण रुग्णालय.