शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलचा तडीपार गुंड सुनील साबळेवर मोक्का

By admin | Updated: July 30, 2015 00:09 IST

वडघर येथील रहिवासी किशोर बाबरे यांच्यावर केलेला हल्ला सुनील साबळेला चांगलाच भोवला आहे. यापूर्वी खून, खंडणी, मारामारी आदी गुन्ह्यांची नोंद असलेल्या साबळेवर मोक्का लावण्यात आला आहे.

पनवेल : वडघर येथील रहिवासी किशोर बाबरे यांच्यावर केलेला हल्ला सुनील साबळेला चांगलाच भोवला आहे. यापूर्वी खून, खंडणी, मारामारी आदी गुन्ह्यांची नोंद असलेल्या साबळेवर मोक्का लावण्यात आला आहे. सुनील फरार आहे. सुनील साबळे याच्यावर पनवेल पोलीस ठाण्यात दहा गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच कर्जत पोलीस ठाण्यातही एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वडघर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये टोलेजंग इमारतींची कामे सुरू आहेत. बांधकाम साहित्य पुरविण्यावरून असोत किंवा वीजजोडणीचा ठेका मिळविण्यासाठी साबळे हा दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. तसेच वडघर येथील विद्युत ठेकेदार किशोर बाबरे याने याठिकाणी वीजजोडणीचा ठेका घेतला होता यामुळे साबळे याने आपल्या हस्तकांमार्फत बाबरेवर प्राणघातक हल्ला केला असल्याचा आरोप किशोर याने केला होता. दबाव आल्यानंतर पनवेल पोलिसांनी साबळे याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सुनील साबळे हा ठाणे, मुंबई, उपनगर, रायगड या चार जिल्ह्यातून तडीपार केलेला गुंड आहे. बाबरेसह पाच जणांवर मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. साबळे, कैकाडी या गँगची लढाई अनेक दिवसांपासून सुरू आहे.