शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

पनवेलकरांची वाट खडतर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:59 IST

पहिल्याच पावसात पनवेल शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पनवलेकरांचा प्रवास खडतर झाला आहे

वैभव गायकर  पनवेल : पहिल्याच पावसात पनवेल शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पनवलेकरांचा प्रवास खडतर झाला आहे. पावसाचे पाणी साचून रस्त्यावर तयार झालेल्या डबक्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दरदिवशी लहान-मोठे अपघात होत आहेत. एकूणच या खड्डेमय प्रवासाला पनवेलचे रहिवासी वैतागले आहेत.पनवेल शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. शहरात न्यायालय, मुख्य बाजारपेठ, तहसील कार्यालय, महानगर पालिका मुख्यालय, रेल्वे स्टेशन, दवाखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती आदींसह महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. यामुळे शहरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. संपूर्ण तालुक्यातील रहिवासी विविध कामांसाठी शहरात येतात. परंतु शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पहिल्याच पावसात बहुतांशी रस्ते उखडले गेले आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सध्याच्या घडीला साईबाबा मंदिर ते रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता, गार्डन हॉटेलपासून महापालिका मुख्यालयाकडे जाणारा नित्यानंद मार्ग, पनवेल काँग्रेस भवन, कफ नगर, पनवेल न्यायालयासमोरील रस्ता आदींची दयनीय अवस्था झाली आहे. पनवेल महानगर पालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून विविध निवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेमुळे कोणत्याही कामांचे टेंडर काढण्यात आलेले नाही. २ जुलैनंतर आचारसंहिता शिथिल होणार आहे. यानंतरच विकासकामांना गती येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशी मागणी पनवेलकरांकडून करण्यात येत आहे.शहरात पडलेले खड्डे लवकरच बुजविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. रस्त्यांची कायमस्वरूपी डागडुजी करण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या जाणार आहेत. तत्पूर्वी आचारसंहिता शिथिल झाल्यावर विविध कामांच्या निविदा काढल्या जातील. यात शहरातील रस्त्यांच्या नूतनीकरणाला प्राधान्य दिले जाईल.- गणेश देशमुख,आयुक्त,पनवेल महानगर पालिकाशहरातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेशी तत्काळ पत्रव्यवहार केला जाईल. एखाद्या खड्ड्यामुळे अपघात होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. प्रसंगी आवश्यक तेथे खड्डे बुजविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कार्यवाही केली जाईल.- अभिजित मोहिते,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, पनवेल