शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलकरांची आरोग्यविषयक हेळसांड थांबणार; उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:06 IST

बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार

वैभव गायकर

पनवेल : पनवेलमधील बहु-प्रतिक्षित उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार उद्घाटनासाठी ११ सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

पनवेलमधील ग्रामीण रुग्णालय शहराच्या एका टोकाला आहे. या रुग्णालयात मनुष्यबळ व साधनसामग्रीची कमतरता असल्याने पनवेलकरांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. नव्याने तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात खाटांची संख्या १२० इतकी आहे. तर २० खाटांचे ट्रॉमा सेंटर आहे. या व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदनगृह आदीची सुविधा आहे. सध्याच्या घडीला पनवेलमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे पनवेलमधील अनोळखी मृतदेह वाशी येथील एनएमएमसीच्या रुग्णालयात ठेवावे लागतात. त्यामुळे नवी मुंबईतील महापालिकेचे शवगृहसुद्धा अपुरे पडू लागले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयात या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शवविच्छेदनासाठी वेगळा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ कमी होणार आहे. पनवेल तालुक्याचा विस्तार मोठा आहे. शहरात एकही मोठे सरकारी रुग्णालय अस्तित्वात नसल्याने खासगी रु ग्णालयांकडे रुग्णांना धाव घ्यावी लागते. त्यामुळे सर्वसामान्यांची लुबाडणूक होत आहे; परंतु नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज रुग्णालयामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, फिजिओथेरिपिस्ट आदीची सेवा अल्पदरात नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

मागील महिन्यात रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांनी या रु ग्णालयाच्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन रुग्णालयाच्या इमारतीची उर्वरित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता काम पूर्ण झाले असून ११ सप्टेंबर रोजी या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांनी दिली.

मोठी गैरसोय दूर होणारमुंबई-गोवा, मुंबई-पुणे द्रुतगती, जेएनपीटी-ठाणे, सायन-पनवेल आदी महामार्ग पनवेल शहरातून जातात. देशातील व्यस्त अशा महामार्गापैकी हे महामार्ग आहेत. या महामार्गावर सतत अपघात घडत असतात, अशा वेळी या परिसरात एकही ट्रॉमा सेंटर नसल्याने मोठी गैरसोय होत होती. या उपजिल्हा रुग्णालयामुळे मोठी गैरसोय दूर होणार आहे.