शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

महापालिकेसाठी पनवेलकर उत्सुक

By admin | Updated: May 2, 2016 02:18 IST

पनवेल महापालिकेला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कळंबोली, कामोठे तसेच पनवेल परिसरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिकांनी प्रस्तावित महापालिकेचे

- प्रशांत शेडगे,  पनवेलपनवेल महापालिकेला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कळंबोली, कामोठे तसेच पनवेल परिसरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिकांनी प्रस्तावित महापालिकेचे स्वागत केले आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास रहिवाशांनी व्यक्त केला आहे. पनवेल शहर पनवेल नगरपालिकेच्या अधिपत्याखाली आहे. दीडशे वर्षे जुनी नगरपालिका असली तरी विकासाकरिता अनेक अडचणी येत आहेत. नवीन पनवेलबरोबर कळंबोली, कामोठे, खारघर वसाहत सिडकोने विकसित केली. यात खासगी इमारतींचा सुध्दा समावेश आहे. आजच्या घडीला लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कळंबोली वसाहत ही साडेतीन मीटर खाली आहे. त्याचबरोबर येथे अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. पाणी, रस्ते, कचरा, सांडपाण्याची अवस्था अतिशय बिकट आहे. अनेक नागरी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे कळंबोलीकर सिडकोवर कमालीचे नाराज आहेत. सिडकोला पर्याय म्हणून महापालिकेकडे स्थानिक रहिवासी पहात आहेत. महापालिका झाली तर कचरा वेळच्या वेळी उचलला जाईल. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास स्थानिक रहिवासी वंदना बामणे यांनी व्यक्त केला आहे. तेच प्रश्न, तीच आश्वासने यामुळे आम्ही हैराण झालो आहेत. सिडको फक्त नावापुरती आहे, विकास काहीच नाही, त्याकरिता महापालिका झालीच पाहिजे असे मत येथील नागरिक विष्णू धुरी यांनी व्यक्त केले आहे. या परिसरात डासांचे तर सांगूच नका, मलेरिया व डेंग्यू फ्री असल्याची खोचक टीका बालाजी घुमे यांनी केली. यावर रामबाण उपाय म्हणजे महापालिकाच असे स्पष्ट मत घुमे यांनी लोकमतकडे व्यक्त केले आहे. कामोठे वसाहतीतील रहिवासी सुध्दा पनवेल महापालिकेबाबत सकारात्मक आहेत. येथील रहिवाशांकडून अधिक पसंती मिळत आहे. नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत सुध्दा पनवेल महानगरपालिका व्हावी याकरिता सकारात्मक आहेत. अलर्ट सिटिझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुपचे संजय भोपी यांनी पनवेल महापालिका झाली तर खांदा वसाहतीचा नक्की विकास होईल. त्याचबरोबर सिडकोला चांगला पर्याय मिळेल, असे सांगितले.