शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलला हवे ६५० एमएलडी पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2016 01:43 IST

प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा अहवाल जवळपास तयार झाला आहे. समितीने याकरिता विस्तृत सर्व्हे केला आहे. वाढती लोकवस्ती त्याचबरोबर पायाभूत सुविधांचाही आढावा घेण्यात आला आहे

वैभव गायकर, पनवेलप्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा अहवाल जवळपास तयार झाला आहे. समितीने याकरिता विस्तृत सर्व्हे केला आहे. वाढती लोकवस्ती त्याचबरोबर पायाभूत सुविधांचाही आढावा घेण्यात आला आहे. यात भविष्यात पनवेल महानगरपालिकेची तहान वाढणार असून दिवसाला प्रतिदिन ६५० एमएलडी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. या पाण्यासाठी बाळगंगा आणि हेटवणे धरणावर महापालिकेची मदार राहणार असून एमजेपी व एमआयडीसीकडूनही पाणी घ्यावे लागणार आहे.पनवेल आणि सिडको वसाहतीतील लोकवस्ती जवळपास आठ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका व्हावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वारंवार लावून धरली आहे. या संदर्भात विधानसभेत प्रश्नही उपस्थित केला होता. या व्यतिरिक्त पनवेल महापालिका व्हावी यासाठी चौका चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या सगळ्याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली. या समितीने गेल्या काही दिवसात भौगोलिक स्थिती, कृषिक अकृषिक क्षेत्र,नगरपालिका, ग्रामपंचायतीचा महसूल, भौगोलिक व प्रशासकीय सलगता, लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ आदी गोष्टींचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. पनवेल शहर, सिडको वसाहती, नैना क्षेत्रातील गावांचा यामध्ये समावेश आहे. या ठिकाणी महापालिका झाल्यानंतर नेमके काय बदल होतील. त्याचबरोबर कोणत्या पायाभूत सुविधांची आवश्यकता भासणार आहे. याबाबत अहवाल तयार करण्यात आलेला आहे. यात महापालिका झाली तर पाण्याच्या आवश्यकतेबाबत आकडेवारी काढण्यात आलेली आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासणार असल्याचे अहवाल नमूद करण्यात आल्याचे समजते. त्याचबरोबर ही तहान भागविण्याकरिता कोणते कोणते पर्याय आहेत, याचीही चाचपणी करण्यात आलेली आहे. कामोठे वसाहतीला नवी मुंबई महानगरपालिकेकडून तर खारघरला हेटवणे धरणातून पाणी दिले जाते. आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा योजना असल्या तरी त्या किती चालू आहेत, ही बाब संशोधनाची आहे. कित्येक गाव बोअरवेलवर अवलंबून आहेत. त्यामुळे जर महानगरपालिका झाली तर पाण्याचे नेमके काय नियोजन करावे लागेल याचा अभ्यासही समितीने केला असून यात पनवेल महापालिकेला प्रतिदिन ६५० एमएलडी पाण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.