शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

पनवेल महापालिकेला हिरवा कंदील

By admin | Updated: December 18, 2015 00:39 IST

गेली अनेक वर्षे रखडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रस्तावाला आता गती मिळाली आहे. पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी महानगरपालिका होण्याचा ठराव एकमताने

पनवेल : गेली अनेक वर्षे रखडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रस्तावाला आता गती मिळाली आहे. पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी महानगरपालिका होण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. याकरिता विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी सूचना सुचवल्या असून यांचा प्रस्तावात समावेश करण्यात करण्यात आला आहे. सिडकोने पनवेल परिसरात नवीन पनवेल, खारघर, कामोठा, कळंबोली, उलवे, तळोजा हे नोड विकसित केले. आजूबाजूच्या परिसराचाही नैना प्राधिकरणांतर्गत विकास करण्यात येणार आहे. पनवेल परिसराची लोकसंख्या आठ ते नऊ लाखांच्या आसपास पोहचल्यामुळे याठिकाणी स्वतंत्र पनवेल महापालिका स्थापन करण्यात यावी असा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी धूळखात आहे. मध्यंतरी सिडकोचे पनवेल तालुक्यातील नोड नवी मुंबई महानगरपालिकेकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. सिडकोकडून पायाभूत सुविधांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. कामोठेतील परिस्थिती अतिशय बिकट असून कळंबोली, खारघरची स्थिती फारशी वेगळी नाही. म्हणूनच पनवेल स्वतंत्र महानगरपालिका व्हावी, याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी लावून धरली. या संदर्भात विधानसभेत सुध्दा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या व्यतिरिक्त स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली होती. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. ही समिती एक महिन्यात भौगोलिक, नगरपालिका, महसूल, अतिरिक्त मनुष्यबळ आदी गोष्टींचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. यावर निर्णय घेण्याकरिता अनिल भगत यांनी सभागृहासमोर ठराव मांडला. त्याला सर्वपक्षीय संमती मिळाल्याने पनवेल महानगरपालिकेचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या मोकळा झाला असल्याची प्रतिक्रि या नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी दिली.प्रस्तावाला शेकापचा पाठिंबाशेतकरी कामगार पक्षाने पनवेल महापालिकेच्या प्रस्तावाला आधी विरोध केला होता. मात्र वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधांवर येणारा ताण, सिडकोकडून घेतले जाणारे बेजबाबदारीचे धोरण या सर्व गोष्टींचा विचार करून पक्षाने या प्रस्तावाला पाठिंबा दिला. विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी स्मार्ट सिटीकरिता खर्च करण्यात येणारे ३७ हजार कोटींपैकी काही निधी प्रस्तावित पनवेल नगरपालिकेला देण्यात यावा, नैनाची नगररचना स्वीकारायची की महानगरपालिकेची स्वतंत्र योजना असेल, याबाबत स्पष्टीकरण असावे, ग्रामीण भागात लावणाऱ्या कराबाबत स्पष्टता असावी, महानगरपालिका क्षेत्राकरिता पाणी आणणार कुठून, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.