शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जप्त प्लास्टिकचे पनवेल महानगरपालिका करणार विघटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 23:34 IST

महानगरपालिके चे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची घोषणा केली होती.

- वैभव गायकर पनवेल : महानगरपालिके चे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची घोषणा केली होती. या बंदीनंतर पनवेल महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानदार, व्यापाऱ्यांवर कारवाई केली, या वेळी जप्त के लेल्यासुमारे सात टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचे पालिका व्यवस्थापन करणार आहे.

पालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच २०१७ पासून हे प्लास्टिक एकत्रित जप्त करण्यात आले आहे. आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत जप्त केलेला सुमारे ७९७२.७ किलोग्रॅम प्लास्टिक शास्त्रोक्त पद्धतीने विघटनासाठी गो ग्रीन इन्विरोटेक या रायगड जिल्ह्यातील रोहा स्थित कंपनीला देण्यात येणार आहे.

प्लास्टिक पिशव्याचे सुमारे ३०० पेक्षा जास्त वर्षे विघटन होत नसल्याने पर्यावरणाला मोठा धोका आहे. विशेष म्हणजे, प्लास्टिकमधील घातक घटकांपासून कर्करोगासारखे आजार मोठ्या प्रमाणात बळावत आहेत. अशा परिस्थितीत या प्लास्टिकची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेची आहे, याकरिता महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून सूचित करण्यात आलेल्या रोहा येथील गो ग्रीन इन्विरोटेक कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

पनवेल महानगरपालिकेने स्थापनेपासून राबविलेल्या प्लास्टिक पिशव्या विरोधी मोहिमेत मोठ्या प्रमाणात दंडदेखील संबंधित दुकानदार व्यापाऱ्यांकडून वसूल केला आहे. ही रक्कम सुमारे ३९ लाख ७१ हजार २०० रुपये एवढी आहे. या दंडाची रक्कमच या प्लास्टिकच्या योग्य विघटनासाठी संबंधित कंपनीला देण्यात येणार आहे. पालिकेने जप्त केलेल्या प्लास्टिकचे योग्य पद्धतीने विघटन होणे गरजेचे असल्याचे मत आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केले.

पनवेल महानगरपालिकेने जप्त केलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे योग्य रीतीने विघटन होणे गरजेचे आहे. याकरिता गो ग्रीन इन्विरोटेक या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. शास्त्रोक्तरीत्या प्लास्टिकचे विघटन केल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही.- डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका, पनवेल

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र