शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सिडको नोडसह पनवेलची स्वच्छतेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:05 IST

पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतील रस्त्यांसह दुभाजक आणि पदपथ स्वच्छ करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे कळंबोलीसह पनवेल शहरातील रस्ते व पदपथ चकाचक झाले आहेत.

कळंबोली : पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतील रस्त्यांसह दुभाजक आणि पदपथ स्वच्छ करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे कळंबोलीसह पनवेल शहरातील रस्ते व पदपथ चकाचक झाले आहेत. विशेष म्हणजे रस्त्यांसह आजूबाजूचे मोकळे भूखंड सुद्धा स्वच्छ करण्यात आले आहेत.पनवेल महापालिका क्षेत्रात २९ महसुली गावांसह सिडको वसाहत आणि नगरपरिषद क्षेत्रांचा समावेश आहे. पनवेल महापालिकेने आपल्या क्षेत्रात व्यापक प्रमाणात स्वच्छता अभियान राबविले आहे. त्यामुळे शहरात नेहमी दिसणारे कचऱ्याचे ढीग आता दुर्मीळ झाले आहेत. विशेष म्हणजे कचरा व्यवस्थापन सिडकोकडे असताना शहरात अपेक्षित स्वच्छता राखली गेली नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कचºयाचे साम्राज्य पाहावयास मिळत असे. मात्र ही सेवा वर्ग झाल्यानंतर महापालिकेने स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. सध्या शहरात दोन वेळा घंटागाडीतून कचरा संकलित केला जातो. शिवाय रस्ते व पदपथांची नियमित स्वच्छता केली जाते. सफाईचे काम करणाºया प्रत्येक कर्मचाºयाला दिवसाला ८00 ते ९00 मीटर रस्ता स्वच्छ करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या कामात कोणत्याही प्रकारची कुचराई होवू नये, यादृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. रस्त्यासह दुभाजक आणि पदपथांवर कचरा साचणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. याचा परिणाम म्हणून रस्ते, दुभाजक, पदपथ आणि मैदान चकाचक दिसत आहेत.पाणी निचरा होणारे मार्ग मोकळेरस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा गटारांमध्ये निचरा व्हावा, यादृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रस्त्यालगतचे पाण्याचे मार्ग मोकळे करण्यात आले आहेत. पनवेल शहरासह सिडको नोड्स, कळंबोली स्टील मार्केट आणि तळोजा एमआयडीसी क्षेत्रातसुद्धा लक्षणीय स्वच्छता दिसून येत आहे.

टॅग्स :panvelपनवेल