शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

पनवेलच्या आमदाराची दोरी शहरी मतदारांहाती, ६ लाख ३४ हजारांपैकी ६५ टक्के मतदार शहरी

By वैभव गायकर | Updated: October 19, 2024 14:30 IST

एकेकाळी उरण आणि पनवेल हे दोन्ही मतदारसंघ एकच होते. सिडको प्रकल्पामुळे नवीन नोड स्थापन केले गेले. या नोडमध्ये कालांतराने शहरी मतदार वाढू लागले.

पनवेल :  पनवेल विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील टॉप पाच मतदारसंघातील एक असून, नव्याने झालेल्या मतदार नोंदणीत जवळपास ४३ हजार मतदार वाढल्याने पनवेल विधानसभेची मतदारसंख्या ६ लाखांच्या पार झाली आहे. यात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार शहरी भागातील असल्याने या मतदारांवर या मतदारसंघाची धुरा असणार आहे. 

एकेकाळी उरण आणि पनवेल हे दोन्ही मतदारसंघ एकच होते. सिडको प्रकल्पामुळे नवीन नोड स्थापन केले गेले. या नोडमध्ये कालांतराने शहरी मतदार वाढू लागले. शिवाय तालुक्यातील २३ ग्रामपंचायती पनवेल महानगरपालिकेत विलीन होऊन पनवेल महापालिका उदयास आली. मुंबईतील वाहतूक कोंडी, प्रदूषण, गर्दी यामुळे अनेकांनी पनवेल परिसरात धाव घेतली. यामुळे झपाट्याने शहराची लोकसंख्या वाढली. एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आज भाजपचा गड बनला आहे. शेकापची स्थानिकांसोबत जुळलेली नाळ त्या तुलनेत शहरी मतदारांना आपलेसे करू शकली नसल्याने शेकापमधून बाहेर पडलेले आ. प्रशांत ठाकूर तीन वेळा येथून निवडून आले. या विजयामागे शहरी मतदार महत्त्वाचा फॅक्टर आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघातील ५४४  पैकी जवळपास ३७० बूथ शहरी भागातील असल्यामुळे येथील उमेदवारांना शहरी मतदारांची मतांवर आपली छाप सोडावी लागणार आहे. सध्याच्या घडीला पनवेल विधानसभेत भाजपकडून आमदार प्रशांत ठाकूर, शेकापमधून माजी आमदार बाळाराम पाटील तसेच उद्धवसेवेतून शिरीष घरत आणि लीना गरड यांची नावे चर्चेत आहेत. अपक्ष म्हणून कांतीलाल कडूदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

पनवेलमधील मतदार -३,३७,९०९ पुरुष २,९६,२१५ महिला ७३ तृतीयपंथी६,३४,१९७ एकूण मतदार 

प्रचाराची सुरुवातही...शहरी भागात खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, नावडे, कामोठे, तळोजे या सिडकोनिर्मित वसाहतीत ३१७ बूथ आहेत. तर ग्रामीण भागात १४४ बूथ आहेत. यामध्ये देखील ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना ३१ हजारांची लीड मिळाली होती, तर उद्धवसेनेच्या मशाल चिन्हावर लढणाऱ्या संजोग वाघेरे यांनादेखील पनवेलध्ये फटका बसला होता. यामुळे शहरी मतदारांवर डोळा ठेवून अनेक संभाव्य उमेदवारांनी आपल्या परीने प्रचाराला सुरुवात केली आहे.

नैनाविरोधात नाराजीपनवेलमध्ये सिडकोने नैना प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पाच्या धोरणाविरोधात वेळोवेळी निदर्शन करण्यात आली. नैना प्रकल्पाबाबत नाराजी हा ग्रामीण भागातील कळीचा मुद्दा आहे.

पाण्याचा प्रश्न भीषणपनवेलची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सिडको एकीकडे हजारो घरांचे गृहप्रकल्प उभारत असताना दुसरीकडे पूर्वीच्या गृहप्रकल्पांना मुबलक पाणी मिळत नाही. याव्यतिरिक्त पालिका हद्दीत वाढीव मालमत्ता कर, प्रदूषण हे विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. 

 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024panvelपनवेल