शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये फेरीवाल्यांचा महामोर्चा

By admin | Updated: January 25, 2017 05:03 IST

पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यापासून शहर व परिसरातील हजारो बेकायदा हातगाड्या व फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात

पनवेल : पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यापासून शहर व परिसरातील हजारो बेकायदा हातगाड्या व फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन संलग्न नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना पनवेल यांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता. यावेळी हजारो फेरीवाले सहभागी झाले होते. पनवेल शिवाजी सर्कलपासून सुरू झालेला हा मोर्चा पनवेल महापालिकेच्या समोर येऊन धडकला. पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चाचे रु पांतर सभेत झाले. जगण्याचा अधिकार हा घटनात्मक अधिकार असून या अधिकारापासून फेरीवाल्यांना वंचित करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पथविक्रेता अधिनियम २०१४ या संसदेत पारित केलेल्या कायद्याचे पनवेलमध्ये उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप मोर्चात करण्यात आला. यावेळी अनेकांच्या हातात पालिकेच्या विरोधात निषेध करणारे फलक होते. एकीकडे पनवेलला स्मार्ट सिटी बनविण्याचा विचार होत आहे, तर दुसरीकडे हजारो फेरिवाल्यांचे रोजगार हिरावून घेतले जात आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे फेरीवाले, पथ विक्रेते म्हणून स्वयंरोजगार करणाऱ्या श्रमिकांवर उपासमारीची वेळ आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मोर्चात माजी नगरसेवक संदीप पाटील, गणेश कडू, अनुराधा ठोकळ, विनिता बाळेकुंद्री, एस.के.नाईक आदींसह हजारो फेरीवाले उपस्थित होते. (वार्ताहर)