शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल फेस्टिव्हलला आजपासून सुरूवात, पहिल्या दिवशी अडीचशे कलाकारांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 03:03 IST

रोटरी क्लब आॅफ पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फेस्टिव्हलचे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक रोडलगतच्या सर्कल मैदानावर दहा दिवस रंगणाºया फेस्टिव्हलची सुरुवात अडीचशे कलाकारांच्या उपस्थित होणार आहे. ते विविध कलागुणांचे सादरीकरण करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. ‘लोकमत’ या फेस्टिव्हलचे माध्यम प्रायोजक आहे.

कळंबोली : रोटरी क्लब आॅफ पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फेस्टिव्हलचे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक रोडलगतच्या सर्कल मैदानावर दहा दिवस रंगणाºया फेस्टिव्हलची सुरुवात अडीचशे कलाकारांच्या उपस्थित होणार आहे. ते विविध कलागुणांचे सादरीकरण करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. ‘लोकमत’ या फेस्टिव्हलचे माध्यम प्रायोजक आहे.पनवेल फेस्टिव्हलची सुरुवात शोभयात्रेने करण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीने होणाºया कार्यक्र मात ढोल ताशे, सांस्कृतिक ग्रुप, कला पथक सहभागी होणार आहेत. या वेळी पारंपरिक वाद्यगजर होणार आहे. वेगवेगळे फ्युजन हे उद्घाटन समारंभाचे आकर्षण असणार आहे. शनिवारी ‘गर्जतो मराठी’ यामध्ये मराठी अस्मिता जपणारे नृत्य, संगीताचे कलाविष्कार सादर होणार आहेत. रविवारी ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४० मॉडल्स सहभागी होणार आहेत. सोमवारी २५ डिसेंबर रोजी ‘रोटरी क्लब आॅफ द एअर’ हा कार्यक्र म संपन्न होणार आहे. त्यामध्ये रोटरी सदस्य सहभाग घेतील त्यातून बेस्ट कपलची निवड करण्यात येईल. मंगळवारी संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनचरित्रावर आधारित सोनिया परचुरे यांचा नृत्याविष्कार होईल. २७ डिसेंबरला, ‘मिस्टर आणि मिस पनवेल’ हा कार्यक्रम होईल. २८ डिसेंबरला २२ कलाकार ग्रुप डान्स करतील, ‘कलर्स आॅफ इंडिया’ यामध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. हा कार्यक्र म २९ डिसेंबर रोजी संपन्न होईल. ३० आणि ३१ डिसेंबर रोजी अनुक्र मे ‘थ्री डी काना’, ‘मोक्ष’ हे शो सादर होणार आहेत. थ्री डी कानामध्ये तीन तासांत कृष्णलीला दाखवली जाणार आहे. रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी आणि रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, ‘लोकमत’चे पदाधिकारी, पनवेल शहरातील अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.पनवेल फेस्टिव्हलचे खास आकर्षणमनोरंजनासोबत अत्याधुनिक रेल्वे तंत्रज्ञानाची माहिती पार्थ-सौमित्र-कृष्णमै या साधकांनी भारतात तयार केलेल बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाचे मॉडेल ठेवण्यात येणार आहे. मामाच्या गावातून समुद्राखालून भरधाव वेगाने धावणाºया ट्रेनच्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहेत. स्वयंचलित सिग्नलिंग, इंटर लॉकिंग, मार्ग बदल आदी आरटीएमएस सिस्टीम पाहायला मिळणार आहे. या महोत्सवासाठी पनवेलकरांनी भेट देण्याचे आवाहन रोटरी क्लबचे चेअरमन संतोष आंबवणे यांनी केले आहे.

टॅग्स :panvelपनवेल