शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल शहर होणार प्लास्टिकमुक्त!, राज्यातील पहिली महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:27 IST

पनवेल महानगरपालिकेची वाटचाल प्लास्टिकमुक्त महानगरपालिकेकडे सुरू आहे. १९ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, २ आॅक्टोबरपासून पालिकेने यासंदर्भात किरकोळ

पनवेल : पनवेल महानगरपालिकेची वाटचाल प्लास्टिकमुक्त महानगरपालिकेकडे सुरू आहे. १९ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, २ आॅक्टोबरपासून पालिकेने यासंदर्भात किरकोळ व्यापा-यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर आणि वापरावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल महापालिका राज्यातील पहिली प्लास्टिकमुक्त महापालिका असल्याचा दावा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केला आहे.पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी आयुक्त शिंदे यांच्यासह उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त संध्या बावनकुळे, सहायक आयुक्त तेजस्वीनी गलांडे उपस्थित होते. शिंदे यांनी पालिका क्षेत्रातील रहिवाशांना कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले.महापालिकेच्या वतीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पालिका क्षेत्रातील दुकानदारांना यासंदर्भात नोटिसाही पाठविण्यात आल्या होत्या. किरकोळ विक्रेते, व्यापारी यांना आवाहन करून त्यांच्यासोबत बैठकाही घेण्यात आल्याचेही आयुक्तांनी या वेळी सांगितले.दिवाळीनिमित्त, १८ ते २१ आॅक्टोबर दरम्यान व्यापारी, विक्रे त्यांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात सूट देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर वारंवार सूचना देऊनही प्लास्टिक पिशव्या बाळगणाºया दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला. सुमारे २३६० किलो प्लास्टिकच्या पिशव्या कारवाईत जप्त करण्यात आल्या आहेत.मॉल्स, डी-मार्टमधील प्लास्टिक पिशव्यांवरही बंदीसध्याच्या घडीला मॉल्स, डी-मार्ट या ठिकाणांचा नवीन ग्राहक वर्ग तयार झाल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे वितरण या ठिकाणांहून केले जात असते. आयुक्त शिंदे यांनी यासंदर्भात संबंधित प्रशासनासोबत बैठका घेऊन त्यांना प्लास्टिकच्या पिशव्या न वापरण्याच्या सूचना दिल्याने मॉल्समध्ये कागदी पिशव्यांच्या स्वागतहार्य निर्णय घेण्यात आला आहे.प्लास्टिक पिशव्यांची पाळेमुळे भिवंडी-उहासनगरात५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालूनही, अशा पिशव्यांची निर्मिती केली जात आहे. भिवंडी व उल्हासनगरात अशा प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मितीचे अनधिकृत कारखाने असल्याचे आयुक्त शिंदे यांनी सांगितले. मात्र, कार्यक्षेत्राबाहेर असल्याने अशा कारखान्यांवर थेट कारवाई करता येत नाही. यासंदर्भात संबंधित आयुक्तांशी संपर्क साधून, अशा कारखान्यांवर कारवाईची मागणी केली आहे.