शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल शहराला अतिक्रमणमुक्त करणार

By admin | Updated: June 3, 2017 06:38 IST

पनवेलचे प्रथम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली होताच फेरीवाल्यांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. फेरीवाल्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेलचे प्रथम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली होताच फेरीवाल्यांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. फेरीवाल्यांनी आपल्या हातगाड्या पूर्वीप्रमाणे रस्त्यावर थाटल्या आहेत. आता पुन्हा एकदा पनवेलच्या आयुक्तपदी डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती झाल्याने पनवेल शहर स्वच्छ, सुंदर व स्मार्ट बनविणार असल्याचे मत आयुक्त सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केले आहे. आॅक्टोबर २०१६मध्ये पनवेल पालिकेची स्थापना झाली. नवीन व प्रथम आयुक्त म्हणून सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पनवेलच्या नागरिकांना अपेक्षित असे शहर बनविण्याचा निश्चय केला होता. सुधाकर शिंदे महापालिकेचे आयुक्त असताना शहरातील हातगाड्या, बेकायदा फलक, अनधिकृत बांधकामे यावर सरसकट कारवाई केली होती. बेकायदा फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, महापालिकेची निवडणूक लागल्याने व शिंदे हे भाजपाच्या मंत्र्यांचे भाऊ असल्याने पनवेल पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने त्यांची उल्हासनगर येथे बदली केली होती. मतदान पार पडल्यानंतर आयुक्त शिंदे यांची पुन्हा एकदा पनवेल महापालिकेत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्र मण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली झाल्याचे समजताच हातगाडीचालक व अतिक्रमण करणारे खूश झाले व त्यांनी आपल्या हातगाड्या रस्त्यावर आणण्यास सुरुवात केली. सुधाकर शिंदे यांच्या जागी राजेंद्र निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची पनवेलमधील अतिक्रमणसंबंधी ठोस भूमिका घेतलेली नव्हती. त्यामुळे शहरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत होते. आयुक्त सुधाकर शिंदे हे जाताच शहरात हातगाड्या, अनधिकृत फलक वाढू लागले. सुधाकर शिंदे यांच्या कारवाईने येथील नागरिक सुखावले होते तर अतिक्र मण करणारे दु:खी झाले होते. मात्र, आयुक्तांच्या बदलीने नागरिक नाराज झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. शहर बकाल दिसू लागल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. मात्र, पालिकेचे अधिकारी निवडणुकीत गुंतल्याने कारवाई होत नसल्याचे उत्तर मिळत होते.