शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Panvel: पनवेल शहरातील भारत नगर झोपडपट्टीवासियांची पालिकेवर धडक 

By वैभव गायकर | Updated: May 12, 2023 15:40 IST

Panvel News: पनवेल शहरातील पटेल मोहल्ला भारत नगर येथील झोपडपट्टी वासियांनी दि.12 रोजी पालिका मुख्यालयावर धडक देत पालिकेने घरे खाली करण्यासंदर्भात दिलेल्या नोटिसांबाबत प्रशासनाला जाब विचारला.

- वैभव गायकर पनवेल - पनवेल शहरातील पटेल मोहल्ला भारत नगर येथील झोपडपट्टी वासियांनी दि.12 रोजी पालिका मुख्यालयावर धडक देत पालिकेने घरे खाली करण्यासंदर्भात दिलेल्या नोटिसांबाबत प्रशासनाला जाब विचारला.पावसाळा तोंडावर आला असताना घरे खाली कशी करणार असा या रहिवाशांचा प्रश्न होता.

पालिकेने या झोपडपट्टीवासीयांचा सर्वेक्षण केला आहे.येथील जवळपास 900 जणांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे मिळणार आहेत.संबंधित काम सुरु करण्याच्या दृष्टीने पालिकेने या रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.याकरिता पालिकेच्या माध्यमातून संबंधितांना घर भाडे देखील देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आम्हाला भाड्याने घर कुठे मिळेल ? असा प्रश्न करत शेकडोंच्या संख्येने झोपडपट्टी धारक पालिका मुख्यालयासमोर धरणे दिले.प्रशासनाने दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात म्हणुन आम्ही याठिकाणी आलो असल्याचे मेहबूब शेख या मोर्चात सहभागी झालेल्या तरुणाने यावेळी सांगितले.पालिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला सुरुवात करण्याच्या तयारीला असताना येथील झोपडपट्टी वासियांनी या कामाला खो घातल्याचे चित्र यामुळे पहावयास मिळत आहे.

 संबंधित नागरिकांचा पालिकेवर मोर्चा नव्हता.प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आम्हीच त्यांना चर्चेसाठी बोलावले होते.मात्र येताना मोठ्या संख्येने हे नागरिक आले.जमलेल्या नागरिकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.- कैलास गावडे (उपायुक्त,पनवेल महानगरपालिका )

टॅग्स :panvelपनवेल