शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये दहशतवाद विरोधी कक्ष कागदावरच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:13 IST

कळंबोली सुधागड शाळा परिसरात सापडलेल्या बॉम्बच्या घटनेमुळे पनवेल परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

- वैभव गायकरपनवेल : कळंबोली सुधागड शाळा परिसरात सापडलेल्या बॉम्बच्या घटनेमुळे पनवेल परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा दहशतवाद्यांचा मोठा कट असल्याचे देखील बोलले जात आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी या निमित्ताने सुरक्षिततेविषयीच्या त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. विशेषत: प्रत्येक पोलीसठाण्यात दहशतवादी विरोधी कक्ष असणे गरजेचे आहे; परंतु पनवेलमध्ये हा कक्ष कागदावरच असल्याचे दिसून आले आहे.दशहतवादी विरोधी कक्षात एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. या कक्षामार्फत पोलीसठाण्याच्या हद्दीतील संशयित वस्तू, संशयित व्यक्ती आदीसह सुरक्षेबाबत सतर्कता राखण्याचे काम केले जाते. मात्र, कळंबोलीमधील घटनेत सुरक्षेच्या बाबतीत मोठा हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. सुधागड शाळा सायन-पनवेल महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर आहे. कळंबोलीच्या प्रवेशद्वाराजवळ नेहमीच पोलिसांची नाकाबंदी असते. अशा परिस्थितीत एवढ्या मोढ्या घटनेची कोणालाच कुणकुण लागली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एका हातगाडीवर हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यासाठी हे बॉम्ब ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बॉम्बसोबत वायर्स, बॅटरी, डेटोनेटर आढळल्याने मोठ्या तयारीने संशयित आरोपीने हा प्रकार केला. घटनेतील संशयित आरोपी घटनेत वापरलेली हातगाडी वाहून नेतानाचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. संबंधित संशयित आरोपी डोक्यावर व तोंडावर कपडा बांधून मार्गक्र मण करताना या चित्रीकरणात दिसत आहे. संबंधित आरोपीने हा प्रकार अतिशय नियोजनबद्धरीत्या केल्याचे या प्रकरणातून उघड होत आहे. मात्र, या घडामोडी होत असताना पनवेलमधील दशहतवादी विरोधी कक्ष कुठे होता, हा प्रश्न उद्भवत आहे.लवकरच होणार उलगडाया घटनेतील आरोपीचा शोध घेण्याचे काम युद्घपातळीवर सुरू आहे. ज्या दुकानातून बॉम्बसाठी लागणाºया वस्तू खरेदी केल्या आहेत, त्या दुकानापर्यंत तपास यंत्रणा पोहोचली आहे. लवकरच महत्त्वाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक पोलीसठाण्यात नियमानुसार दशहतवादी विरोधी कक्ष कार्यरत करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Anti Terrorist Squadएटीएसpanvelपनवेल