शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पांडवकडा यंदाही बंदच

By admin | Updated: June 16, 2016 01:24 IST

नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात नैसर्गिक धबधबा असणे ही कल्पनाच सुखावणारी आहे. म्हणूनच खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत

- वैभव गायकर, पनवेल

नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात नैसर्गिक धबधबा असणे ही कल्पनाच सुखावणारी आहे. म्हणूनच खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आले आहे. मात्र पर्यटकांचा अतिउत्साहीपणा हा त्यांच्याच जीवावर बेतत असल्याचे अनेक वेळा पहावयास मिळाले आहे. यामुळेच वन विभागाने धबधब्यावर प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. वन विभागाच्या या निर्णयामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. सिडकोने वसविलेल्या खारघर शहराचे रूपांतर लवकरच स्मार्ट सिटीत होणार आहे. शहराला नैसर्गिक सांैदर्य लाभले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला पांडवकडा धबधबा हा देखील शहराला ओळख प्राप्त करून देणारे पर्यटन स्थळ बनले आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक या धबधब्याला भेट देत असतात. वन विभागाने घातलेली बंदी झुगारून पर्यटक हा निर्णय घेत असतात. काहींना यामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे. आजवर या ठिकाणी बळी गेलेल्या पर्यटकांचा आकडा शेकडोच्या वर गेलेला आहे. विशेष म्हणजे ठाणे, कल्याण, मुंबई, उपनगर, रायगड, पनवेल आदी ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी येत असतात. दरवर्षी वन विभाग पर्यटकांना या ठिकाणी प्रवेशबंदी असल्याचे बोर्ड लावत असते. यावर्षी देखील या कामाला सुरु वात झाली आहे. दर्शनी भागात पर्यटकांना प्रवेशबंदी असल्याचे सूचना फलक आम्ही लावणार आहोत, असे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ठाकरे यांनी सांगितले. परवानगीशिवाय वन हद्दीत प्रवेश करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे पर्यटकांनी कायदा हातात न घेता नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पावसाळा सुरू झाली की धबधबा सुरू होतो. त्यानुसार आम्ही या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करीत असतो. स्थानिक पोलीस ठाण्याची मदत घेतली जाते, त्यानंतर पोलीस देखील या ठिकाणी बंदोबस्तासाठी असतात. निसर्गप्रेमींमध्ये नाराजी पांडवकडा धबधबा हा पावसाळ्यात सुरू होतो. निसर्गप्रेमी पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी अथवा त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी दुरून खारघरमध्ये येत असतात. मात्र या ठिकाणी आल्यावर त्यांच्या लक्षात येते की धबधब्यावर बंदी आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये मोठी नाराजी आहे. काही अटी वा शर्तीच्या आधारे या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशाची परवानगी द्यावी, अशी मागणी पर्यटनप्रेमी करीत आहेत. वन विभागाच्या उपाययोजना पांडवकडा धबधब्यावरून पडलेल्या पाण्याचा प्रवाह जास्त असतो. या गोष्टीचा अंदाज न लागलेले पर्यटक पाण्यात उतरत असतात. यामुळे अनेक वेळा दुर्घटना घडल्या असून काही पर्यटकांचा मृत्यू देखील झाला आहे. दरवर्षी अनेक सूचना करून देखील पर्यटक आपला जीव गमावत असतात. यामध्ये तरु ण व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश सर्वात जास्त असतो. धबधब्यावरून जोरात वाहून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी करण्यासाठी याठिकाणी वनविभागाने दोन दगडी बंधारे बांधले असल्याचे शिवाजी ठाकरे यांनी सांगितले. तळीरामांवर निर्बंधपावसाळ्यात बंदी झुगारून अनेक पर्यटक पांडवकडा धबधब्याजवळ मद्यप्राशन करीत असतात. याप्रकारामुळे परिसरात बाटल्यांचा खच पडतो. तसेच मद्यधुंद अवस्थेत तोल धबधब्यात पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तळीरामांवर कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.