शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पामबीच रोड ठरतोय मृत्यूचा सापळा; वर्षभरात ९ जणांचा मृत्यू, ९ गंभीर जखमी

By नामदेव मोरे | Updated: February 29, 2024 18:57 IST

नियमबाह्यपणे जॉगींगसाठीही उपयोग

नवी मुंबई : अतीवेग व निष्काळजीपणामुळे पामबीच रोड मृत्यूचा सापळा ठरत आहे. गत वर्षभरात अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून ९ गंभीर जखमी झाले आहेत. ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पामबीच रोडचा चालणे व धावण्याचा व्यायाम करण्यासाठीही उपयोग केला जात असून त्यामुळे अपघात होवून जीवीतहानी होण्याची शक्यताही वाढली आहे.

नवी मुंबईमधील महत्वाच्या रस्त्यांमध्ये पामबीच राेडचा समावेश आहे. सायन - पनवेल महामार्गावरील भार कमी करण्यासाठी व वाशी ते बेलापूर अंतर कमी वेळेत पूर्ण करता यावे यासाठी या रस्त्याची निर्मीती केली आहे. महानगरपालिकेने या रोडवर अपघात होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. स्पीड लिमीटचे सुचना फलक लावले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी पांढरे पट्टे मारले आहेत. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रोडच्या दोन्ही बाजूला व दुभाजकाला लागून लोखंडी बॅरीगेट्स तयार केले आहेत.

वाहतूक पोलिसांनी सुचविलेल्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु वाहन चालक नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे या रोडवरील अपघात वाढत आहेत. पामबीच रोडवर बहुतांश वाहनचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करत आहेत. अतीवेगामुळे वाहनांवरील ताबा सुटून अपघात होत आहेत. वर्षभरात २३ गंभीर अपघात झाले आहेत. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या व्यतिरिक्त दाखल न झालेल्या किरकोळ अपघातांची संख्याही खूप आहे.

पामबीच रोडवर पादचाऱ्यांना मनाई आहे. परंतु रोज सकाळी चालणे व धावण्याचा व्यायाम करण्यासाठी अनेक नागरिक पामबीच राेडचा उपयोग करत आहेत. यापुर्वी अपघातामध्ये पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करून धावण्यासाठी पामबीच रोडचा उपयोग सुरूच आहे. सायकलींगचा उपयोग करणारांचीही संख्या वाढत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. कार व दुचाकीस्वारांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्यामुळे बहुतांश अपघात होत असून संबंधीतांवर ठोस कारवाईची मागणी होत आहे.

धूम स्टाईल शर्यतीपामबीच रोडवर रात्री ११ नंतर पहाटेपर्यंत धूम स्टाईल स्पोर्ट बाईकच्या शर्यती सुरू असतात. कानठळ्या बसविणारा आवाज करत १२० पेक्षा जास्त वेगाने या बाईक पळविल्या जात आहेत. कर्नकर्कश आवाजामुळे इतर वाहन चालकांचे लक्ष विचलीत होवून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

इंटेलच्या माजी अधिकाऱ्याचा मृत्यूचेंबूर येथे राहणारे अवतार खुशाल सिंह सैनी व त्यांच्या सहकाऱ्यांचा सीएजीसी हा सायकल ग्रुप आहे. चेंबूर वरून ते खारघर पर्यंत सायकलींगचा व्यायाम करत असतात. २८ फेब्रुवारीला पहाटे सैनी व त्यांचे सहकारी पामबीच रोडवरून एक कडेने जात असताना मागून वेगाने आलेल्या कारने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने सैनी यांना डॉ.डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे निधन झाले. सैनी हे इंटेलचे माजी अधिकारी होते. या प्रकरणी टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई