शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

पालघर जिल्ह्यात मुसळधार

By admin | Updated: June 19, 2015 21:52 IST

पालघर जिल्ह्णात सर्वात जास्त पाऊस वसई तालुक्यात ४४९ मि. मि. इतका तर सर्वात कमी पाऊस मोखाडा तालुक्यात ८०.२ मि. मि. पडल्याची नोंद झाली आहे.

हितेन नाईक, पालघरपालघर जिल्ह्णात सर्वात जास्त पाऊस वसई तालुक्यात ४४९ मि. मि. इतका तर सर्वात कमी पाऊस मोखाडा तालुक्यात ८०.२ मि. मि. पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्णातील वसई ते डहाणू दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावरील घरांचे लाटांच्या तडाख्याने नुकसान झाले आहे. कुठेही प्राणहानी वा वित्तहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडून देण्यात आली असली तरी पालघर तालुक्यातील पारगाव येथील जिल्हापरिषद शाळेची भिंत कोसळून चार वर्गखोल्यांना तडे गेले आहेत. यात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.वसई तालुक्यात आज १४८.७ मि. मि. पावसाची नोंद करण्यात येऊन एकुण ४४९ मि. मि. पाऊस पडण्याची नोंद करण्यात आली आहे. वाडा तालुक्यात आज २३.३ मि. मि. पाऊस तर एकुण १४४.३ मि. मि. पाऊस, डहाणू तालुकयात आज ६.१ मि. मि. पाऊस पडला असून एकूण २४८.१ मि. मि. , पालघर तालुक्यात आज ४९.६ मि. मि. पाऊस तर एकुण ३२४.६ मि. मि. पासुस, जव्हार तालुक्यात आज ५ मि. मि पाऊस तर एकूण १०९.३ मि. मि. पाऊस, मोखाडा आज २.९ मि. मि. पाऊस तर एकूण ८०.२ मि. मि. पाऊस, तलासरीमध्ये आज शुन्य पाऊस तर एकूण १६७.७ मि. मि. पाऊस विक्रमगड मध्ये आज ४.९ मि. मि. पाऊस तर एकूण १७३.६ मि. मि. पावसाची नोंद करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.पालघर जिल्ह्णात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी यंत्रणा तयारीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी जिल्ह्णातील सुमारे चार हजार पाड्यापैकी काही पाड्यावर एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास त्यासाठी उपाययोजना आखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे उभे राहीले आहे. जिल्ह्णातील तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा हे अतिदुर्गम डोंगराळ भाग असल्याने येथे मुसळधार पाऊस पडल्यास नदी, नाल्यांना पूर येऊन येथील पाड्यांचा शहरांशी संपर्क तुटतो. यावेळी नदी-नाले ओलांडणारे व्यक्ती, वाहने बुडून अनेकांचे बळी जात असतात. त्यामुळे जिल्ह्णात एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यास त्याचा सामना करण्याबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.मुंबईच्या तुलनेने पालघर जिल्ह्णात पावसाचे प्रमाण कमी असले तरी ६ जून रोजी पावसाने सुरूवात केल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र आठही तालुक्यात पावसामुळे कुठेही प्राणहानी वा वित्तहानीच्या घटना घडलेली नाही. पालघरसह काही तालुक्यात विकासकांनी नैसर्गिक नाल्यावर बेकायदेशीर बांधकामे केल्याने शहरी भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच विद्युत वितरण विभागाकडून जुनाट खांब आणि तारा बदलण्याचे काम पूर्ण करण्यात न आल्याने ग्रामीण भागातील खांब कोसळणे आणि तारा तुटून विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच डहाणू ते वसई तालुक्या दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावरील संरक्षक बंधाऱ्याची दुरावस्था झाल्याने किनाऱ्यावरील मच्छिमारांसह अनेकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. त्यात लाईट गेल्याने त्यांची अवस्था दारुण झाली.