हितेन नाईक ल्ल पालघर
जव्हार मधील रोजगार हमी योजनेंतर्गत कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी चांभारशेत व परिसरातील 15 ग्रामपंचायतीचे सोशल ऑडीट 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान जव्हारच्या चांभारशेत पासून होईल.
पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या चांभारशेत, खरोंडा इ. आदिवासी बहुल भागात रोहयोअंतर्गत कामे बोगस पद्धतीने होऊन त्यात दिड कोटी रू. चा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असून विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रूक ग्रामपंचायत अंतर्गत गावातही विहिर खोदणो, स्मशानभूमी बांधणो, नर्सरी उभारणो इ. कामात तर डहाणु तालुक्यातील वाघाडी, वनई इ. भागातही या योजनेंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाल्याची प्रकरणो पुढे आली आहेत. लोकमतने या प्रकरणांचा पाठपुरावा सुरू ठेवल्यानंतर मंत्रलयीन पातळीवरून सोशल ऑडीटसाठी नेमलेल्या समीतीचे प्रमुख राहुल तिवरेकर, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 डिसेंबर रोजी जव्हारच्या आदिवासी भवनमध्ये सोशल ऑडीट चे प्रशिक्षण शिबीर पाड पडले होते.
पालघर जिल्ह्यातील हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी व यातील दोषी अधिका:यांवर कडक कारवाई करण्यासाठी आता 21 ते 25 डिसेंबर दरम्यान सोशल ऑडीट होणार असून प्रमुख समन्वयक तिवरेकर, उपजिल्हाधिकारी पारधे, संबंधीत भागातील तहसिलदार गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तक्रारदार, लाभार्थी इ. च्या यामध्ये समावेश असणार आहे. या प्रकारचे ऑडीट प्रत्येक तालुक्यात होणार असून रोहयो मधील सर्व कामांचा तपशील यावेळी तपासला जाणार आहे.
सामाजिक अंकेक्षणाद्वारे ऑडीट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधीत भ्रष्टाचार व त्यामधील दोषींवर कारवाई करण्यासंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी पारधे यांनी लोकमतला दिली. त्यामुळे तीनही तालुक्यातील भ्रष्टाचार झालेल्या विभागातील अधिकारी, कर्मचारी मध्ये घबराट पसरली असून भ्रष्टाचाराचे बुरखे पांघरून समाजात फिरणा:या अधिका:यांचे पितळ लवकरच बाहेर पडणार आहे.