शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाच्या अतिवेगाने घेतला चिमुकल्याचा बळी; खारघरमधील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 26, 2024 19:18 IST

यामध्ये ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. खारघरमध्ये रविवारी झालेल्या अश्वमेघ यज्ञाला उपस्थित राहून सर्वजण घरी जाण्यासाठी खारघर स्थानकाकडे येताना हा अपघात घडला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : खारघर येथे भरधाव रिक्षाचा अपघात होऊन चौघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. खारघरमध्ये रविवारी झालेल्या अश्वमेघ यज्ञाला उपस्थित राहून सर्वजण घरी जाण्यासाठी खारघर स्थानकाकडे येताना हा अपघात घडला. 

रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे सतत अपघाताच्या घटना घडत असतात. अशाच प्रकारातून खारघरमध्ये अपघात घडवून ९ वर्षीय मुलाचे प्राण गमावले आहेत. भिवंडी येथे राहणारे घनश्याम नायक व ऋषिकेश दुबे सहकुटुंब खारघरमधील अश्वमेघ यज्ञासाठी आले होते. दुपारच्या सुमारास सर्व विधी उरकून दोन्ही कुटुंबे घराकडे चालले होते. यासाठी ते एकाच रिक्षाने खारघर स्थानकाकडे येत होते. यावेळी रिक्षात दुबे पती पत्नी व नायक यांची पत्नी व ९ वर्षाचा मुलगा दिव्याप्रसाद असे बसलेले होते. रिक्षा चालक सतीश उत्तेकर (२८) याच्याकडून अति वेगात रिक्षा पळवली जात असताना त्याचे नियंत्रण सुटून रिक्षा दुभाजकाला धडकून अपघात झाला.

यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले असता त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी दिव्याप्रसाद (९) याला मृत घोषित केले. तर इतर तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी रिक्षा चालक सतीश उत्तेकर याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मार्गावर रिक्षा चालकांच्या वेगावर नियंत्रण नसल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील येत होत्या. अखेर अति वेगामुळे अपघात घडून चिमुकल्याला प्राण गमवावे लागले आहेत.