शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतील पार्किंगवर अवजड वाहनांचा ताबा

By admin | Updated: July 13, 2015 02:46 IST

वाशीतील इनॉर्बिट मॉलजवळ असलेल्या महापालिकेच्या वाहनतळावर अवजड वाहनांनी कब्जा केला आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकांना आपली वाहने

नवी मुंबई : वाशीतील इनॉर्बिट मॉलजवळ असलेल्या महापालिकेच्या वाहनतळावर अवजड वाहनांनी कब्जा केला आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकांना आपली वाहने पार्क करण्यासाठी शेजारच्या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. या प्रकाराकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.रेल्वे स्थानक परिसरातील मॉल्स व पंचतारांकित हॉटेल्समुळे या भागात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पार्किंगच्या पुरेशा सुविधा नसल्याने वाहनधारक वाटेल तेथे वाहने पार्क करतात. त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. या परिस्थितीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने इनॉर्बिट मॉलच्या शेजारी सायन-पनवेल मार्गाला लागून असलेल्या भूखंडावर महापालिकेने पे अ‍ॅण्ड पार्क सुरू केले आहे. त्यासाठी खासगी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या पार्किंगचा उपयोग खासगी वाहनधारकांपेक्षा मालवाहू अवजड वाहनांना अधिक होत आहे. विशेष म्हणजे सायन-पनवेल मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पामबीच मार्गावर येण्यासाठी याच पार्किंगसमोरून रस्ता आहे. त्यामुळे सायन -पनवेल मार्गावरून पामबीचकडे वळण घेणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. प्रसंगी अपघाताची शक्यता वाढली आहे. ठेकेदाराला समज देऊन वाहनतळ खासगी वाहनांसाठी खुले करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)