शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

योग्य नियोजनातून टंचाईवर मात

By admin | Updated: April 25, 2017 01:15 IST

एमजेपीकडून करण्यात आलेली पाणीकपात त्याचबरोबर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू नये याकरिता पनवेल महापालिकेने शहरात दोन

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीएमजेपीकडून करण्यात आलेली पाणीकपात त्याचबरोबर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू नये याकरिता पनवेल महापालिकेने शहरात दोन झोन पाडून येथे दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु नागरिकांची ओरड पाहून प्रशासनाने तीन दिवस दररोज पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर इतर चार दिवसांत दोन दिवस जास्त दाबाने पाणी दिले जाणार आहे. पनवेलकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.पनवेल पालिकेने शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता १०० वर्षांपूर्वी धरण विकसित केले आहे. एकूण १५ किमी अंतरावर असलेल्या या धरणातून जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलाशयात एकूण ३.५७ दशलक्ष घनमीटर क्षमता पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती. मात्र पावसाळ्यात माथेरानच्या डोंगराहून पाण्याबरोबर वाहत येणारा गाळ धरणात बसल्यामुळे खोली कमी होत आहे. त्यामुळे पाणी साठवून ठेवण्याची क्षमताही कमी झालेली आहे. जुलै ते मार्च देहरंग धरणातून एकूण १२ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर उर्वरित पाणी एमजेपी आणि एमआयडीसीकडून घेण्यात येते.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा महापालिकेला पाण्याचा मुख्य स्रोत आहे. त्याशिवाय पनवेलकरांची तहान पालिका प्रशासन भागवू शकत नाही. परंतु एमजेपीची वाहिनी जीर्ण झालेली असल्याने तिला फुटीचे ग्रहण लागले आहे. तसेच टाटा पॉवर कंपनीकडून सुटीच्या दिवशी पाताळगंगा नदीत पाणी सोडले जात नसल्याने पात्रात पाण्याची कमतरता भासू लागलेली आहे. यामुळे एमजेपीला मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करता येत नाही. त्यामुळे शहरवाशीयांना सुध्दा पूर्वीप्रमाणे मुबलक पाणी देता येता नाही. पनवेल शहराला सुमारे २७ एमएलडी पाण्याची गरज आहे. आजच्या घडीला एमजेपी आणि एमआयडीसीकडून प्रत्येकी ८ आणि ७ एमएलडी पाणी प्राप्त होत आहे.म्हणजे एकूण १५ एमएलडी पाणी बाहेरून प्राप्त होत आहे. त्याच पाण्यावर पनवेलकरांची तहान भागविण्यात येत होती. परंतु त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओरड सुरू आहे. झोन करून दिवसाआड पाणी देण्यात येत होते. परंतु आता तीन दिवस नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला.