शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बाहेरील रुग्णांचा नवी मुंबईवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 00:41 IST

स्थानिकांची होतेय परवड : राजकीय शिफारशीमुळे प्रशासन हतबल

कमलाकर कांबळेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईतील खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांत शहराबाहेरील रुग्णांचा अतिरिक्त भार वाढल्याने स्थानिक रुग्णांची परवड होताना दिसत आहे. मुंबई, ठाणे आणि पनवेल परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात नवी मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे करदात्या नवी मुंबईकरांनाच बेडसह इतर आरोग्य सुविधांसाठी वणवण करावी लागत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्स बेड‌्सची संख्या अपुरी पडू लागली आहे, तर ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. बेड मिळविण्यासाठी नवी मुंबईकरांना कसरत करावी लागत आहे. विविध स्तरावर प्रयत्न करूनही वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दर्जेदार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेकडे सध्या २३०० ऑक्सिजन बेड‌्स आहेत, तर ५०५ आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड आहेत. सुमारे चार हजार साध्या खाटा आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येत्या काळात आवश्यकतेनुसार खाटांची संख्या वाढविण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. तसेच खासगी रुग्णालयांतसुद्धा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड आहेत. असे असतानाही नवी मुंबईकरांना बेड मिळविण्यासाठी मोठे श्रम करावे लागत आहेत. शेजारच्या शहरातील रुग्णांचे अतिक्रमण हे यामागचे कारण असल्याचा आरोप नवी मुंबईकर करू लागले आहेत.निवडणुका रखडल्याने महापालिकेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजित बांगर हे महापालिकेचे आयुक्त व प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. कोरोनाच्या महामारीत त्यांचे काम उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनासुद्धा तितक्याच प्रभावी ठरताना दिसत आहेत. परंतु सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदारांच्या दबावाखाली महापालिका प्रशासन काम करीत असल्याचा आरोप केला जात आहे. कारण शहराबाहेरील रुग्णांना नवी मुंबईत सर्रास बेड उपलब्ध करून दिले जात आहेत. महापालिकेच्याच नव्हे, तर खासगी रुग्णालयांतसुद्धा शेजारच्या शहरातील रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे स्थानिक रुग्णांना बेड आणि इतर वैद्यकीय सुविधांसाठी भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनीसुद्धा यासंदर्भात प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. नवी मुंबईतील ऑक्सिजनचा साठा परस्पर शेजारच्या शहरात वळविला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सोशल मीडियावर चर्चानवी मुंबई महापालिकेत सध्या लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू आहे. महापालिका आयुक्त त्याला बळी पडत आहेत. परंतु हे अधिक काळ चालणार नाही. नवी मुंबईतील जनता हा अन्याय कदापी खपवून घेणार नाही, अशा आशयाचे संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवी मुंबईत साधारण १० ते १५ टक्के रुग्ण गोवंडी, मानखुर्द, चेंबूर तसेच ठाण्याच्या मुंब्रा परिसरातील आहेत. राजकीय दबावामुळे बाहेरील रुग्णांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना बेडसाठी वणवण करावी लागत आहे. या प्रकाराकडे माजी नगरसेवक आणि शहरातील आमदार हतबल होऊन पाहत आहेत, ही नवी मुंबईकरांची मोठी शोकांतिका आहे.- प्रदीप नामदेव म्हात्रे, अध्यक्ष, दिव्यादीप फाउण्डेशन, नवी मुंबई 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या