शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोमांस विक्री प्रकरणातील आरोपी हद्दपार

By admin | Updated: January 3, 2017 05:52 IST

गोमांस विक्री प्रकरणात सापडलेल्या सराईत गुन्हेगाराला हद्दपार करण्यात आले आहे. त्याच्यावर सानपाडा व कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे

नवी मुंबई : गोमांस विक्री प्रकरणात सापडलेल्या सराईत गुन्हेगाराला हद्दपार करण्यात आले आहे. त्याच्यावर सानपाडा व कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सद्यस्थितीला देखील त्याच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे त्याला हद्दपार करण्यात आले आहे. रिझवान शरीफ शेख (४२) असे हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. कोपरखैरणे पोलिसांनी यापूर्वी त्याला गोमांस विक्री प्रकरणी अटक केलेली आहे. गोमांस विक्रीविरोधी कायदा झाल्यानंतरची ती पहिलीच कारवाई होती. राजकीय वरदहस्त वापरून त्याच्याकडून उघडपणे गोमांस विक्री सुरू होती. खैरणे गावातील त्याच्या या ठिकाणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाने त्याच्यावर कारवाई केली होती. तसेच त्याच्या इतर साथीदारांनाही अटक केली होती. या कारवाईनंतर त्याने पोलिसांवर दबावतंत्र वापरण्यासाठी काही मंत्र्यांशी देखील मध्यस्थामार्फत संपर्क साधला होता. याच कालावधीत त्याच्यावर इतर तीन गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्याशिवाय सानपाडा पोलीस ठाण्यातही त्याच्यावर दोन गुन्हे दाखल होते. अनेकदा नोटीस बजावूनही त्याला प्रतिसाद न देता गुन्हेगारी हालचाली सुरूच ठेवल्या होत्या. यामुळे समाजहितासाठी त्याला हद्दपार करण्याच्या प्रक्रियेला उपआयुक्त प्रशांत खैरे यांच्यामार्फत प्रक्रियेला सुरवात झाली होती. त्यानुसार नववर्षाच्या संध्येवर रविवारी त्याला हद्दपारीची नोटीस बजावून एक वर्षासाठी शहराबाहेर पाठवले आहे.