शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या ईटीसीचा पॅटर्न राबवणार ओरिसा सरकार

By admin | Updated: May 2, 2017 03:26 IST

सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारा देशातील एकमेव नवी मुंबई महापालिकेचा ईटीसी पॅटर्न ओरिसा सरकार राबवणार

नवी मुंबई : सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारा देशातील एकमेव नवी मुंबई महापालिकेचा ईटीसी पॅटर्न ओरिसा सरकार राबवणार आहे. त्याकरिता ओरिसा राज्याचे सामाजिक सुरक्षा, दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय अभ्यासदौरा करण्यात आला. या वेळी त्यांनी ईटीसी केंद्राच्या संपूर्ण कामकाजाची माहिती ज्ञात करून घेतली.नवी मुंबई महापालिकेचे ईटीसी केंद्र पंतप्रधान पुरस्काराप्रमाणेच इतरही अनेक राष्ट्रीय व राज्य पुरस्काराने नावाजले जात आहे. एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारे हे केंद्र देशात एकमेव आहे. त्यामुळे विविध राज्यांतील शासकीय व निमशासकीय तसेच खासगी संस्थांकडून हा पथदर्शी उपक्रम म्हणून अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच ओरिसा सरकारने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या ईटीसी केंद्राप्रमाणेच ओरिसा राज्यात केंद्र साकारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याकरिता ओरिसा राज्यातील सामाजिक सुरक्षा आणि दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त पथकाने नवी मुंबईला भेट दिली आहे. त्यांच्या या दोन दिवसीय अभ्यासदौऱ्या दरम्यान ईटीसीच्या संचालिका वर्षा भगत यांनी त्यांना केंद्राच्या संपूर्ण कामकाजाची माहिती दिली. या पथकामध्ये सामाजिक सुरक्षा आणि दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाचे प्रधान सचिव नितेनचंद्रा, संचालक मानसी निम्बल, सह संचालक आर. के. शर्मा व युनिसेफच्या मधुमिता दास आदी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी, पालक तसेच तज्ज्ञांसोबतही संवाद साधला.