नवी मुंबई : ऐलमा पैलमा गणेशदेवा, माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा, नाच गं घुमा, घागर घुमू दे...अशी पारंपरिक गीते ऐकली की मंगळागौर या सणाची महिलांना आठवण होतेच. अशा एका आगळ्यावेगळ्या ‘श्रावण संध्या’ या कार्यक्रमात मंगळागौरीचे लोकमत सखी मंंचच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. १२ सप्टेंबरला झुलेलाल मंदिर सभागृह, सेक्टर ९ ए, बस डेपोमागे, वाशी येथे दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम खास महिलांसाठी उत्कर्ष महिला मंडळाच्या महिला सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी नवी मुंबईचे उपमहापौर अविनाश लाड यांचे सौजन्य लाभले आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या समस्या वाढत असून खाण्या- पिण्याच्या सवयी बदलत आहेत. याच अनुषंगाने सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर हे झटपट हेल्दी रेसिपी करून दाखणार आहेत. त्याचबरोबर चांगल्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ खाणे योग्य, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे याबाबत मार्गदर्शन करणार असून आरोग्यविषयक टिप्स देणार आहेत. त्यामुळे ‘श्रावण संध्या’ हा कार्यक्रम महिलांसाठी पर्वणीच ठरणार आहे. महिलांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९१६७७९०४७६ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
‘श्रावण संध्या’चे आज आयोजन
By admin | Updated: September 12, 2015 01:17 IST