शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

नवी मुंबईकरांसाठी खाद्यजत्रेचे आयोजन

By admin | Updated: February 9, 2016 02:34 IST

प्रत्येक प्रांताची स्वत:ची एक ओळख असते ती तिथल्या खाद्यसंस्कृतीमुळे. नवी मुंबई शहरात राहणाऱ्या विविध राज्यांतील नागरिकांमुळे मिनी भारत नावाने संबोधल्या जाणाऱ्या शहरात देशाच्या

नवी मुंबई : प्रत्येक प्रांताची स्वत:ची एक ओळख असते ती तिथल्या खाद्यसंस्कृतीमुळे. नवी मुंबई शहरात राहणाऱ्या विविध राज्यांतील नागरिकांमुळे मिनी भारत नावाने संबोधल्या जाणाऱ्या शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक एकत्रितपणे नांदताना दिसतात. वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता यावा व नवी मुंबईच्या विविधतेचे एकात्म दर्शन घडावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान कालावधीत बेलापूर येथे महानगरपालिकेने बांधलेले किआॅस, सेक्टर ११, प्लॉट नं. ७१, ७२ आणि ७३ नवी मुंबई फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे.चार दिवस चालणाऱ्या या फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन अशाप्रकारचे उपक्र म राबविण्यात येत असून आरोग्य आणि शारीरिक क्षमता या विषयांबाबत जागरुकता निर्माण करण्यात येत आहे. फूड फेस्टिव्हलमध्ये ४० फूड स्टॉल, हस्तकला साहित्य-वस्तू, संगीत आणि नृत्याचे कार्यक्र म अशी विविध आकर्षणे असणार आहेत. याशिवाय फूड फोटोग्राफी व फूड वर्कशॉप या माध्यमातून कलावंतांना प्रोत्साहित केले जाणार आहे तसेच आरोग्यदायी स्वयंपाक आणि खाण्याच्या सवयी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. फेस्टिव्हलमध्ये खवय्यांना आकर्षित करतील अशा मालवणी, मुघलाई, क्वान्टिनेन्टल, बारबेक्यू, ग्रील्ड फूड, आॅरगॅनिक अशा वैविध्यपूर्ण पाककृती असणार आहेत. नवी मुंबईकरांनी या फूड फेस्टिव्हलला आवर्जून भेट देऊन नवी मुंबईच्या विविधतेतून एकता जपणा ऱ्या संस्कृतीचा खाद्यपदार्थांतून आस्वाद घ्यावा व मनोरंजन कार्यक्र मांसह काही क्षण कुटुंबीयांसमवेत एकत्र आनंदाने घालवावेत, असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)