शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिका आयुक्तांच्या समर्थनासाठी संघटनांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:57 IST

पनवेल महपालिकेच्या स्थापनेला सुमारे एक ते दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. सुरु वातीला सत्ताधारी व प्रशासनाकडून एकत्रित काम सुरू होते.

पनवेल : पनवेल महपालिकेच्या स्थापनेला सुमारे एक ते दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. सुरु वातीला सत्ताधारी व प्रशासनाकडून एकत्रित काम सुरू होते. मात्र गेल्या चार-पाच महिन्यांपासून आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे व सत्ताधारी यांच्यात अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या बदलीचा विषय समोर येत आहे. आयुक्तांच्या समर्थनार्थ शहरातील सामाजिक संघटनांनी आवाज उठवण्यास सुरुवात केल्याने ठाकूरशाही विरोधात सामान्य जनता असा संघर्ष पाहायला मिळत आहे.नुकत्याच पार पडलेल्या पनवेलच्या महासभेत सत्ताधाºयांकडून प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले. प्रशासनाकडून कामे होत नसल्याचा ठपका या वेळी ठेवण्यात आला. त्यामुळे आयुक्तांसह अधिकाºयांनी सभात्याग केला. आयुक्तांच्या बदलीवरही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. महापालिकेतील सत्ताधारी व आयुक्तांमध्ये निर्माण झालेल्या वादात आयुक्तांच्या समर्थनार्थ पनवेलमधील सिटीझन युनिट फोरम (कफ), पनवेल महानगर पालिका संघर्ष समिती या संघटना पुढे आल्या आहेत. कफ या संघटनेने आयुक्तांच्या बदलीविरोधात सह्यांची मोहीम हाती घेतली असून जवळपास १२०० जणांच्या सह्यांचे पत्र संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिले आहे. याशिवाय आयुक्तांची बदली थांबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून वेळ पडल्यास रस्त्यावरही उतरू, असेही कफचे अध्यक्ष अरुण भिसे यांनी सांगितले. आयुक्तांच्या भूमिकेमुळे कदाचित सत्ताधाºयांची आर्थिक कोंडी होत असेल म्हणूनच आयुक्तांच्या विरोधात भूमिका घेतली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पनवेल महापालिका संघर्ष समितीच्या माध्यमातून आयुक्त डॉ . सुधाकर शिंदे यांच्या समर्थनार्थ ‘पनवेल बचाव’ ही मोहीम हाती घेत शनिवारी शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावून या संदर्भात रणनीती ठरविली जाणार आहे.खारघर शहरातून देखील आयुक्तांच्या समर्थनार्थ नागरिक पुढाकार घेत असून विविध मोहीम राबविण्यास येत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात आयुक्त चांगले काम करीत आहेत, असे मराठी फाउंडेशनचे मंगेश रानवडे यांनी सांगितले आहे.