शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम थांबविण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:00 IST

पुरातत्त्वीय निकषांचे उल्लंघन; संयुक्त पाहणी

नवी मुंबई : पुरातत्त्वीय निकषांचे उल्लंघन होत असल्यामुळे बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम तत्काळ थांबविण्याचे आदेश राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने दिले आहेत. सिडकोसोबत संयुक्त पाहणी करून पुढील निर्णय होईल.सिडकोच्या वतीने बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम सुरू आहे. नवी मुंबईमधील एकमेव ऐतिहासिक वारसास्थळाची दुरुस्ती पुरातत्त्वीच निकषांप्रमाणे व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. ऐतिहासिक बुरुजांच्या दुरुस्तीसाठी सिमेंटचा वापर करण्यासही आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, तेजस शिंदे, नितीन चव्हाण, श्रीकांत माने, अमोल मापारी यांनी नुकतीच सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन किल्ला संवर्धन कामातील त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या. देशमुख यांनी तत्काळ पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना काम थांबवून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.पुरातत्त्व विभागाने ७ आॅक्टोबरला सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र दिले आहे. किल्ला सवंर्धनाचे काम पुरातत्त्वीय निकषाप्रमाणे होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे सिडकोने तत्काळ संवर्धनाचे काम थांबवावे. स्मारकाची सद्यस्थिती जाणण्यासाठी एकत्रित स्थळ पाहणी करणे आवश्यक असून, त्यासाठी कागदपत्रांसह अधिकारी नियुक्त करावा. सदर अधिकाºयाबरोबर प्रत्यक्ष पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले.