शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

गर्भलिंग चाचणीविषयीचे आदेश धाब्यावर

By admin | Updated: March 16, 2017 03:19 IST

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे गर्भलिंग चाचणी करणारे रॅकेट उघडकीस आल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने सर्व महापालिका

नामदेव मोरे , नवी मुंबई सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे गर्भलिंग चाचणी करणारे रॅकेट उघडकीस आल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने सर्व महापालिका, नगरपालिका व जिल्हा स्तरावर १४ मार्च रोजी तातडीने पत्रकार परिषद घेण्याचे आदेश दिले होते. पत्रकार परिषदेमध्ये मनपा व पोलीस आयुक्तांनाही बोलावून पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठीच्या उपाययोजना व तीन वर्षांतील जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर प्रमाण देण्याचे आदेश दिले होते. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यामध्ये ही माहिती देण्यात आली, पण नवी मुंबई महापालिकेने माहिती न देता आरोग्य विभागाचे आदेश धाब्यावर बसविले आहेत. यामुळे आरोग्य विभागाच्या हेतूवरच संशय व्यक्त केला जात आहे. २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेमध्ये महाराष्ट्रातील बाल लिंग गुणोत्तर प्रमाण ८९४ एवढे होते. २००१ च्या तुलनेमध्ये हे प्रमाण १३ अंशाने कमी झाले आहे. तेव्हापासून राज्यात पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. याविषयी सर्व महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. पण यानंतरही राज्यभर गर्भलिंग चाचण्या होत असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. १ मार्चला सांगली जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या अनोंदणीकृत भारती हॉस्पिटलमध्ये चाचणीदरम्यान महिलेचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये ओझरमधील डॉ. बी. एम. शिंदे याने गर्भपात केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. राज्यात २०१५ मध्ये जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९०७ होते ते २०१६ मध्ये ८ अंकांनी कमी होवून ८९९ वर आले आहे. ही बाब चिंताजनक असल्याने व दोन घटना उघडकीस आल्यामुळे राज्यभर १४ मार्च रोजी तातडीने पत्रकार परिषद घेण्याचे आदेश राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांनी सर्व जिल्हा शल्य चिकित्सक व मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले होते. या पत्रकार परिषदेला पोलीस व मनपा आयुक्तांसह अनेक मान्यवरांना बोलावण्यात यावे असे सूचित केले होते. ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी, वसई विरार, उल्हासनगर व मीरा भार्इंदर महानगरपालिकेने पत्रकार परिषद घेवून त्याविषयी अहवाल दिला आहे. रायगड,पालघर व जिल्हा प्रशासनानेही पत्रकार परिषद घेवून आवश्यक ती माहिती दिली आहे. फक्त नवी मुंबई महापालिकेने या सूचनांचे पालन केलेले नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागावर गर्भलिंग चाचण्या करणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला जावू लागला आहे.अभिषेक कारंडे नावाच्या डॉक्टरने याविषयी मुख्यमंत्र्यांसह सर्व ठिकाणी याविषयी तक्रार केली आहे. शहरात जवळपास २० ठिकाणी गर्भलिंग परीक्षणाची केंद्रे चालू असून या केंद्रांकडून मनपाचे काही अधिकारी पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीसीएनडीटी कायद्याअंतर्गत कोणत्याही नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रातील डॉक्टर किंवा अन्य कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती दिल्यास २५ हजार बक्षीस.जिल्ह्यांमध्ये बेकायदा अनोंदणीकृत केंद्राबाबत तक्रार नोंदविण्यासाठी स्थापीत केलेल्या संकेतस्थळाची माहिती देणेगर्भलिंग चाचण्या होत असल्यास त्याची माहिती देण्यासाठी १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहन पत्रकार परिषद ही माहिती देण्याच्या होत्या सुचना पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होत असल्यास १०४ या टोल फ्री क्रमांकाची माहिती देणे. शहरातील तीन वर्षांचे जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर प्रमाण जाहीर करणेमार्च २०१७ मध्ये राबविण्यात येत असलेल्या धडक तपासणी मोहिमेची माहितीकार्यक्षेत्रामध्ये दाखल करण्यात आलेल्या धडक मोहिमेची माहिती देण्यात यावीजिल्ह्यात एकूण दाखल करण्यात आलेल्या न्यायालयीन प्रकरणांची माहिती, शिक्षा झाली असल्यास त्याबाबतची सविस्तर माहिती द्यावी.२०१६ - १७ मध्ये आयोजित केलेल्या डीकॉय केसेसबाबतची माहिती तसेय डीकॉय केस मिळविण्यासाठीचे आवाहन. पीसीएनडीटी कायदा अंमलबजावणी करताना राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती, कोर्ट केसेसची माहिती, पीसीपीएनडीटी जिल्हा कक्ष, सील केलेल्या सोनोग्राफी केंद्रावर बोर्ड लावण्याबाबतची माहिती, सोनोग्राफी केंद्रांवर बोर्ड लावण्याबाबतची माहिती सोनोग्राफी केंद्रांना देण्यात आलेल्या एमआरसी क्रमांकाची माहिती व इतर उपाययोजनांची माहिती देणे.