शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सर्व यंत्रणांना ‘मॉक ड्रील’चे आदेश

By admin | Updated: May 12, 2016 02:13 IST

येणाऱ्या पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत व बचाव कार्य तातडीने सुरू होऊन आपदग्रस्तांना मदत मिळणे आवश्यक असल्याने आपत्कालीन

अलिबाग : येणाऱ्या पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत व बचाव कार्य तातडीने सुरू होऊन आपदग्रस्तांना मदत मिळणे आवश्यक असल्याने आपत्कालीन परिस्थितीला सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे. तसेच संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांची मॉक ड्रील (उपाययोजना प्रात्यक्षिक) करु न त्याचा आढावा घ्यावा व त्रुटी आढळल्या तर त्या तातडीने दुरूस्त करुन घ्याव्यात, असे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी बुधवारी येथे दिले आहेत.रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी तेली-उगले बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या क्षेत्रात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीनुसार आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करावा, त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावरही तेथील परिस्थितीनुसार आपत्ती आराखडा तयार करावा. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करु न आपदग्रस्तांना मदत देणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांच्याकडील असलेली साधनसामुग्री सुस्थितीत ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेने पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा तसेच रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होतील याचे नियोजन करावे. स्थलांतरीत आपदग्रस्तांना तात्पुरता निवारा देण्यासाठी जिल्ह्यातील शाळा सुस्थितीत ठेवाव्यात. त्यामध्येही आवश्यक ती दुरूस्ती करुन घ्यावी. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पुरेसे अन्नधान्याचा योग्य पुरवठा होण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने योग्य नियोजन करावे. तहसीलदारांनी त्यांच्या क्षेत्रातील सर्व गोदामांचा आढावा घेऊन ती सुस्थितीत ठेवावीत. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील यासाठीही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने योग्य ती दक्षता घ्यावी. सर्व ठिकाणची पर्जन्यमापक यंत्र सुस्थितीत ठेवावेत अशाही सूचना त्यांनी दिल्या.या बैठकीस रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) किरण पाणबुडे, अलिबाग प्रांत सर्जेराव सोनवणे, पेण प्रांताधिकारी प्रेमलता जैतू, पनवेल प्रांताधिकारी भरत शितोळे, कर्जत प्रांताधिकारी दत्ता भडकवार, रोहा प्रांताधिकारी सुभाष भागडे आदी अधिकारी उपस्थित होते.