शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गगराणी यांच्या बदलीला विरोध

By admin | Updated: June 15, 2017 03:15 IST

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या बदलीचा फटका सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास त्यांची

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या बदलीचा फटका सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास त्यांची बदली करू नये, अशी विनंती बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मागील काही दिवसांपासून भूषण गगराणी यांच्या बदलीची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे गगराणी यांना सिडकोचा पदभार स्वीकारून जेमतेम एक वर्ष झाले आहे. या काळात त्यांनी विविध प्रकल्पांना गती दिली आहे. देशाचा प्रकल्प म्हणून पाहिल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. नवी मुंबई मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. त्यातील बहुतांशी स्थानकांचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच सिग्नल यंत्रणांचे कामही पूर्ण झाले आहे. तळोजा येथे मेट्रोसाठी पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एकूणच पहिला टप्पा २0१८ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. तसेच सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जुलै २0१७ पासून पहिल्या टप्प्यातील खारकोपरपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू करण्यात आली आहे. गगराणी यांची बदली झाल्यास हे मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेरूळ-उरण रेल्वेमार्ग पूर्ण झाला आहे. लवकरच या मार्गावरून लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. त्याशिवाय गेल्या वर्षभरात गगराणी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले आहेत. गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न शासकीय स्तरावर सुटला असला तरी त्याची अंमलबजावणी सिडको स्तरावरून केली जाणार आहे. तसेच नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करण्याच्या दृष्टीने गगराणी यांनी कार्यवाही सुरू केली आहे. त्यांची बदली केल्यास या सर्व प्रकल्पांना खीळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी किमान आणखी एक वर्ष तरी गगराणी यांना सिडकोतच ठेवावे, अशी विनंती आमदार मंदा म्हात्रे व आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.