शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेमधील भुयारी मार्ग रहदारीसाठी खुला

By admin | Updated: July 24, 2016 04:03 IST

कोपरखैरणे रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गामध्ये गाळ साचला असल्याने हा मार्ग रहदारीसाठी बंद झाला होता. नागरिकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सिडकोचे

नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गामध्ये गाळ साचला असल्याने हा मार्ग रहदारीसाठी बंद झाला होता. नागरिकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सिडकोचे कार्यक्षेत्र असतानाही पालिकेने गाळ काढून नागरिकांची गैरसोय दूर केली आहे. सेक्टर १४ मधील निसर्ग उद्यानामध्ये वॉक वुईथ कमिशनर उपक्रमाच्या वेळी भुयारी मार्गाच्या समस्येकडे नागरिकांनी आयुक्तांचे लक्ष वेधले होते. भुयारी मार्गामध्ये गाळ साचला आहे. पावसामुळे चिखल तयार झाला असल्याने व मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने या मार्गाचा वापर बंद झाला होता. भुयारी मार्ग सिडकोच्या अखत्यारीत आहे. देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारीही त्यांचीच आहे. परंतु संबंधित प्रशासन लक्ष देत नसल्याने आयुक्तांनी येथील गाळ काढण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागास दिल्या होत्या. शहर अभियंता मोहन डगावकर यांनी तत्काळ येथील गाळ काढून साफसफाई केली आहे. तक्रार केल्यानंतर आठ दिवसांच्या आतमध्ये भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. पालिकेकडे नागरिकांनी केलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात आहे. जी कामे, नियमामध्ये बसणारे प्रश्न आहेत ते तत्काळ सोडविण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून काम करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)