शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संकटावर मात करणे हाच पुरूषार्थ

By admin | Updated: January 25, 2017 05:06 IST

परिस्थिती कशीही, कोणतीही असो, संकटावर मात करणे हाच खरा पुरुषार्थ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत

पनवेल : परिस्थिती कशीही, कोणतीही असो, संकटावर मात करणे हाच खरा पुरुषार्थ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत विजय कुवळेकर यांनी केले. पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या पंधराव्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. शनिवार कृ. प्र. खाडीलकर लिखित ‘संगीत स्वयंवर’ नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. रविवारी उद्योजक जे.एम.म्हात्रे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मात अमृत योगी सभासदाचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमतचे कार्यकरी संपादक विनायक पात्रुडकर, संघाचे अध्यक्ष नंदकुमार जोशी, उपाध्यक्षा शामल आंग्रे व सभासद हजर होते. विजय कुवळेकर यांचा 65 वा वाढदिवस असल्याने त्यांना मंडळाने शुभेच्छा दिल्या. कुवळेकर यांनी, पत्रकारितेच्या क्षेत्रात व शासकीय कामकाजात काम करताना आलेल्या अनुभवचे किस्से यावेळी सांगितले. आपली बाह्य इंद्रिये जेव्हा बंद होतात त्यावेळी अंतचक्षू आदी इंद्रिये कार्यरत होत असतात. समोरच्या संकटावर मात करणे हाच खरा पुरषार्थ असतो, हे घडलेल्या प्रसंगानुरूप किस्से सांगून पटवून दिले. माहिती अधिकारचे आयुक्त असताना घडलेले शासकीय कामकाजाचे किस्से ही त्यांनी यावेळी संगितले. कार्यक्र माचे नियोजन व शिस्त पाहून त्यांनी कौतुक केले. कार्यक्र माचे अध्यक्ष व उद्योजक जे.एम.म्हात्रे यांनी, ज्येष्ठ नागरिक संघासाठी जागा उपलब्ध करून देऊन आपले कर्तव्य पार पडले होते. संघाने परिश्रमाने व जिद्दीने त्याचे सोने करून सुंदर सभागृह उभारून दाखवले याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी २० जेष्ठ नागरिकांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर प्रदीप भुंजे यांनी कार्यक्र माचे सूत्र संचालन केले. (प्रतिनिधी)