शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोकडून केवळ आश्वासनांची खैरात

By admin | Updated: March 25, 2016 01:08 IST

सिडकोने पनवेल व उरण तालुक्यामधील सार्वजनिक सुविधांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. मूळ गावठाणपासून विकसित नोडमधूनही आवश्यकतेप्रमाणे मैदाने व उद्याने विकसित

- नामदेव मोरे,  नवी मुंबईसिडकोने पनवेल व उरण तालुक्यामधील सार्वजनिक सुविधांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. मूळ गावठाणपासून विकसित नोडमधूनही आवश्यकतेप्रमाणे मैदाने व उद्याने विकसित केलेली नाहीत. चार दशकांमधील अपयश झाकण्यासाठी स्मार्ट सिटीच्या नावाखाली ६५ कोटी खर्च करून दोन वर्षामध्ये ७३ उद्याने व ३३ मैदाने विकसित करण्याची घोषणा केली. दक्षिण नवी मुंबई (पनवेल तालुका) ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा सिडकोने केली आहे. पुढील पाच वर्षामध्ये या परिसरामध्ये ५३ हजार २४४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामधील जवळपास ३३ हजार कोटी रुपये सिडको स्वत: खर्च करणार आहे. सिडकोने स्मार्ट सिटीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात पनवेल व उरण परिसरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यात सिडकोला अपयश आले आहे. खारघर ते पनवेल, कळंबोली, कामोठे, तळोजा परिसरामध्ये नागरिकांसाठी मैदानेच नाहीत. मैदाने विकसित करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नोड विकसित करीत असतानाच त्या परिसरामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये उद्याने व मैदाने तयार करण्याची गरज होती. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. खारघरमध्ये करोडो रुपये खर्च करून सेंट्रल पार्कची निर्मिती करण्यात आली. परंतु या उद्यानाची देखभाल दुरुस्तीही सिडको प्रशासनाला करता आलेली नाही. उद्यानावरील सर्व खर्च व्यर्थ गेला आहे. सेंट्रल पार्कप्रमाणेच इतर उद्यानांचीही दुरवस्था झाली आहे. चांगले उद्यान नसल्याने या परिसरातील नागरिकांना नवी मुंबईतील वंडर्स पार्क, रॉक गार्डन व आर. आर. पाटील उद्यानामध्ये जावे लागत आहे. सिडकोने श्रीमंतांचा खेळ समजल्या जाणाऱ्या गोल्फसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. देखभालीसाठी प्रचंड खर्च करावा लागत आहे. गोल्फ कोर्सची निर्मिती व देखभालीसाठी जेवढा खर्च केला तेवढा पनवेल परिसरातील एकूण सर्व मैदानांसाठी खर्च झालेला नाही.नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या सिडकोने स्मार्ट सिटीच्या नावाखाली भव्य स्वप्न दाखविण्यास सुरुवात केली आहे. पुढील दोन वर्षामध्ये ७३ उद्याने विकसित केली जाणार आहेत. यासाठी तब्बल ६५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चाळीस वर्षात जे शक्य झाले नाही ते दोन वर्षात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता प्रत्यक्षात एवढी उद्याने दोन वर्षात पूर्णत्वास जाण्याची शक्यता नसल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.ड्रीम प्रोजेक्टही फसलाखारघर नोड हा सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर उभारण्याचा संकल्प केला होता. परंतु या ठिकाणीही प्रत्येक सेक्टरमध्ये उद्यान व मैदान विकसित करता आलेले नाही. जगातील सर्वात भव्य उद्यान खारघरमध्ये विकसित करण्याची घोषणा सिडकोने केली होती. इंग्लंंड व अमेरिकेमधील उद्यानांचाही अभ्यास केला होता, त्या धर्तीवर सेंट्रल पार्कची निर्मिती करण्यात आली. परंतु हे उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे झालेच नाही. त्यापेक्षा उत्तम उद्याने नवी मुंबई महानगरपालिकेने उभारली आहेत.आंदोलन करण्याची गरजउद्याने व मैदाने प्रत्येक सेक्टरमध्ये व गावांमध्ये उपलब्ध करून देणे ही सिडकोची जबाबदारी आहे. ज्या सेक्टर व नोडमध्ये उद्याने व मैदाने नाहीत तेथील नागरिक, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला पाहिजे. यानंतरही सिडकोने दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.