शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तळोजातील १८ कारखानेच बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 03:18 IST

हरित लवादाच्या माध्यमातून तळोजा एमआयडीसीमधील ३५0 रासायनिक कारखाने बंद करण्याचा कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही

पनवेल : हरित लवादाच्या माध्यमातून तळोजा एमआयडीसीमधील ३५0 रासायनिक कारखाने बंद करण्याचा कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही. केवळ १८ कारखान्यांना बंद करण्याचे आदेश दिलेले असून उर्वरित कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असल्याचे सांगत चुकीच्या माहितीमुळे तळोजा एमआयडीसीमधील कारखानदारांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे दि. १ रोजी टीएमएने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.तळोजा एमआयडीसीमध्ये होत असलेल्या प्रदूषणासंदर्भात नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे. या याचिकेवर दि. ३0 रोजी सुनावणी वेळी हरित लवादाने तळोजा एमआयडीसीमधील ३५0 रासायनिक कारखाने बंद करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांना दिली. मात्र हे वृत्त खोटे असून या वृत्तामुळे तळोजा एमआयडीसीमधील कारखानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशाप्रकारे कोणताच निर्णय हरित लवादाने घेतलेला नसून केवळ १८ कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला असून उर्वरित कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या सचिव जयश्री काटकर यांनी स्पष्ट केले. तसेच ५ कोटी दंड भरण्याचे आदेश हरित लवादाने दिलेले नसून संबंधित रक्कम डिपॉजिट करण्यास सांगितले असल्याचे टीएमएचे श्यामसुंदर कारकून यांनी स्पष्ट केले. या सुनावणीदरम्यान मी स्वत: दिल्लीला उपस्थित असल्यानेसध्या प्रसार माध्यमामध्ये सुरूअसलेले वृत्त खोटे असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकरणी याचिकाकर्ते अरविंद म्हात्रे ही मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शनिवार, रविवार सुट्या असल्याने संबंधित आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही. सोमवारी संबंधित आदेश लेखी स्वरूपात हातात पडल्यावर या प्रकरणी मी दिलेली माहिती सर्वांसमोर येईल.