शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

फी न भरल्याने ऑनलाइन शाळा बंद, संबंधितांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 00:01 IST

ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांमार्फत फी भरली गेली नाही, अशा विद्यार्थ्यांचे आॅनलाइन क्लासेसमधील कनेक्शन बंद केले जात असल्याचा आरोप नगरसेवक हरेश केणी यांनी केला आहे.

वैभव गायकर पनवेल : कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता, शिक्षण संस्थांमार्फत आॅनलाइन शिक्षणाचा आधार घेतला जात आहे. झूम अ‍ॅप्लिकेशनद्वारे विद्यार्थ्यांना घरबसल्या आॅनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मात्र, हा अट्टहास केवळ फी वसूल करण्यासाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांमार्फत फी भरली गेली नाही, अशा विद्यार्थ्यांचे आॅनलाइन क्लासेसमधील कनेक्शन बंद केले जात असल्याचा आरोप नगरसेवक हरेश केणी यांनी केला आहे.या संदर्भात नगरसेवक हरेश केणी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याकडे या संदर्भात लेखी निवेदन दिले आहे. लॉकडाऊन काळात नोकरदार वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असताना, मोठ्या प्रमाणात आर्थिककोंडीत सापडलेल्या पालकांना दिलासा देण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला अनेक शाळांनी फी वसुलीचा तगादा पालकांकडे लावला आहे. मात्र, जे पालक काही कारणास्तव आपल्या पाल्यांची फी भरू शकत नाहीत,े अशा विद्यार्थ्यांना आॅनलाइन वर्गातून वगळले जात असल्याचा गंभीर आरोप केणी यांनी केला आहे.पनवेल महानगरपालिकेतील काही शाळांनी हा प्रकार सुरू केला आहे. या प्रकारामुळे चिमुकल्यांचे खच्चीकरण होण्याची शक्यता आहे. शिक्षण संस्थांमार्फत अशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवेल जात असेल, तर हा गुन्हा आहे. संबंधित शाळांवर कारवाईसाठी शिक्षणमंत्र्यांनाही नगरसेवक हरेश केणी यांनी पत्र लिहले आहे.।आॅनलाइन शिक्षणपद्धती बंद करण्याची मागणीसध्याच्या घडीला आॅनलाइन शिक्षणपद्धती अनेक शिक्षण संस्थांनी अंगीकारली आहे. एमआयएमचे स्टुडंट विंगचे कोंकण निरीक्षक हाजी शहनवाज खान यांनी या शिक्षणपद्धतीला विरोध दर्शविला आहे. या नवीन धोरणामुळे समाजामध्ये भेदभाव निर्माण होत चालला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक एनरॉईड फोन, टॅब खरेदी करू शकत नाहीत, त्यांचे काय? बीडमध्ये हलाकीच्या परिस्थितीमुळे आॅनलाइन शिक्षणापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून या आॅनलाइन शिक्षणाला एमआयएमचे स्टुडंट विंगचे हाजी शहनवाज खान यांनी विरोध दर्शवत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.