शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षक भरतीत ऑनलाइन गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 23:46 IST

मागील अनेक वर्षांपासून रखडलेली सुरक्षारक्षक भरती सुरू झाली आहे.

- वैभव गायकरपनवेल : मागील अनेक वर्षांपासून रखडलेली सुरक्षारक्षक भरती सुरू झाली आहे. सुमारे एक हजार जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रि या पारदर्शक होण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी उमेदवारांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. परंतु तांत्रिक कारणामुळे अनेक उमेदवारांना अद्याप याबाबतचे एसएमएस मिळालेच नसल्याने उमेदवारांत संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.मागील दोन महिन्यापासून ही प्रक्रिया सुरु आहे १९ जुलै याकरिता शेवटची तारीख आहे . एक हजार जागांसाठी सुमारे १४ हजार अर्ज रायगड सुरक्षा महामंडळाला प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या देखील यामध्ये मोठी आहे . राज्य सरकारच्या आदेशाने यावर्षी आॅनलाइन प्रक्रि या पार पडत आहे. त्यानुसार हजारो संख्येने उमेदवारांनी आपली नोंदणी या संकेतस्थळावर केली आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी एसएमएस प्राप्त होत आहेत. मात्र अनेकांनी एसएमएस प्राप्त होत नसल्याची तक्र ार सध्याच्या घडीला उमेदवारांकडून केल्या जात आहेत. नाव न छापण्याच्या अटीवरून अनेक उमेदवार ही तक्र ार केली आहे. या भरती प्रक्रि येत तांत्रिक कारणांमुळे अडथळा तर निर्माण होत नाही ना ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवारांची सुरक्षा मंडळाकडून मैदानी परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर सुरक्षा मंडळाद्वारे निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या निवड प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मंडळाच्या माध्यमातून सरकारी, निमसरकारी, खासगी, रेल्वेस्थानक, सिडको आदी कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केले जाणार आहे.>उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठीचे एसएमएस प्राप्त होत नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. तांत्रिक कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी इंटकच्या माध्यमातून घेतली जाईल. दरम्यान, ही भरती प्रक्रि या पूर्णपणे पारदर्शकपणे पार पाडावी.- महेंद्र घरत,कामगार नेते>भरती प्रक्रि या पारदर्शकपणे पार करण्यासाठी आॅनलाइन प्रक्रि येचा अवलंब करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी एसएमएस प्राप्त होणार आहेत. ज्या उमेदवारांनी फी भरली नसेल त्यांना एसएमएस पाठविण्यात आले नाहीत.- दिनेश दाभाडे,अध्यक्ष,रायगड सुरक्षा मंडळ