शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये वन-वे नावालाच; शहरातील घडी विस्कटली, नागरिकांसह वाहतूक पोलीस जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 23:20 IST

नागरिकांसह वाहतूक पोलीस जबाबदार

वैभव गायकरपनवेल : पनवेल शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा पनवेल शहरात असल्याने दिवसेंदिवस वाढती वाहने, अरुंद रस्ते यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे शहरातील वनवे केवळ नावालाच उरला असून नागरिकदेखील सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत आहेत. 

शहरातील जय भारत नाका परिसरात केवळ वनवेचा बोर्ड लागला आहे. मात्र नियमांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.   जय भारत नाका येथील वनवेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दुचाकीस्वाराला २०० व चारचाकी वाहनाला ३०० रुपये दंड आहे. मात्र वाहतूक पोलीस या ठिकाणी फिरकत नसल्याचे चित्र दिसत आहे. पनवेल शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती, पालिका मुख्यालय, न्यायालये, तलाठी कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त कार्यालय, दोन पोलीस ठाणी, पंचायत समिती कार्यालय तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारी दुकाने आहेत. यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा शहरात असते.

शहरातील अरुंद रस्त्यांबाबत पालिकेने अद्यापही मास्टर प्लॅन तयार केला नसल्याने कित्येक वर्षे जुन्या अरुंद रस्त्यावरून वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. मागील वर्षात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. शहरातील पार्किंगसाठी भूखंड अपुरे आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीची समस्या शहरात गंभीर होत चालली आहे. 

टॅग्स :panvelपनवेल