शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पेणमध्ये ‘एक गाव एक मिरवणुकी’ची प्रथा

By admin | Updated: September 15, 2016 02:30 IST

बाप्पांच्या आगमनाने व दहा दिवस सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी माध्यान्हाची आरती होऊन सगळीकडे बाप्पांच्या मिरवणुकांचा थाटमाट रंगणार आहे

पेण : बाप्पांच्या आगमनाने व दहा दिवस सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी माध्यान्हाची आरती होऊन सगळीकडे बाप्पांच्या मिरवणुकांचा थाटमाट रंगणार आहे. महानगरीय व शहरी भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहसंकुले तथा खासगी गणेशभक्तांकडून गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका काढल्या जातात, मात्र याचा अपवाद असतात गावाकडील मंडळी. पेणच्या प्रत्येक गावात गावाची एक गाव एक मिरवणूक काढून वारकरी भजन मंडळी टाळ-मृदुंगाच्या अभंगवाणीने गणरायाला भावपूर्ण निरोप देतात. लोकमान्यांचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे उद्दिष्ट गावागावात सांघिक एकता-अखंडता राखून करण्यावरच ग्रामीण संस्कृतीचा बाज आहे.पेणमधील तब्बल पाच जिल्हा परिषद मतदार संघातील १७२ गावांमध्ये पारंपरिक पध्दत पूर्वापार चालत आली आहे. एक गाव एक गणपती विसर्जन मिरवणुकीप्रसंगी गावोगावीची भजनी मंडळे गावातल्या प्रत्येक वाड्यात जाऊन घराघरातले गणरायांना घरची प्रमुख मंडळी श्रींची मूर्ती डोक्यावर घेऊन पाड्यातील एकत्रित गणरायांच्या मूर्तींना टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत-गाजत घेऊन गावातल्या सार्वजनिक तलाव, नदीतट अथवा खाडीपात्रातील विसर्जन स्थळावर नेतात. गावातले सगळे गणपती विसर्जन स्थळी आल्यावर तिथे भजन, युवा मंडळींची नाचगाणी असा तब्बल तासभर भक्तिभाव सोहळा रंगतो. सर्वांचीच गणरायाजवळ पीक -पाणी, सुबत्ता व संकट निवारणाची एकत्रित मागणी मनोभावे केली जाते. शेवटी विसर्जन स्थळावर शेवटची सामूहिक आरती होऊन श्रींच्या मूर्तीला विसर्जनाला प्रारंभ होतो. गावातली पट्टीची पोहणारी पुरूष व युवा मंडळी या सर्व मूर्तींचे विधिवत विसर्जन करतात. यावेळी ‘गणपती बाप्पा, मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशी मोठी ललकारी गुंजते. विसर्जन झाल्यावर पाटावर नदीपात्रातील अथवा तलावातील माती घेऊन पुन्हा भजनी मंडळे पार्वती नंदना मोरया गजानना गजानना या घोषणांसह गावात परतात. या ग्रामीण संस्कृतीचा बाज गणेशोत्सवात आजही पहावयास मिळतो. दूरवर नोकरी-धंद्यानिमित्त गेलेले गावचे युवक, पुरूष मंडळी या निमित्ताने एकत्र येतात. बाप्पांच्या दहा दिवसांच्या सहवासात जीवनातला आनंद, एकमेकांची सुख दु:खे, वर्षातील इतर कार्यक्रमाचे नियोजन गणेशोत्सवात होते. गावात श्रींच्या मूर्तीची संख्या जरी मोठी असली तरीही एक गाव, एक मिरवणूक हा उत्सवाचा फंडा कायम आहे. शहरातील वेगवेगळ्या विसर्जन मिरवणुकांचा माहोल पेणमध्ये गुरुवारी पाहता येणार आहे. (वार्ताहर)