शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार नागरिकांमागे एक पोलीस

By admin | Updated: November 16, 2015 02:14 IST

ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या मीरा-भार्इंदर पोलीस डिव्हीजन क्षेत्रात असलेल्या सहा ठाण्यांतर्गत सुमारे ५०० ते ५५० कर्मचारी कार्यरत असल्याने शहरातील सुमारे १२ लाख लोकसंख्येच्या तुलनेने हे मनुष्यबळ अत्यंत

राजू काळे,  भार्इंदरठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या मीरा-भार्इंदर पोलीस डिव्हीजन क्षेत्रात असलेल्या सहा ठाण्यांतर्गत सुमारे ५०० ते ५५० कर्मचारी कार्यरत असल्याने शहरातील सुमारे १२ लाख लोकसंख्येच्या तुलनेने हे मनुष्यबळ अत्यंत तोकडे आहे. सुमारे १० हजार नागरिकांमागे एक पोलीस सुरक्षेचे काम पाहत असल्याचे वास्तव उजेडात आले आहे. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यास लागून असलेल्या मीरा-भार्इंदर शहराचा विकास झपाट्याने होत असून येथील लोकवस्तीदेखील दिवसेंदिवस विस्तारत आहे. या वाढत्या लोकवस्तीत सुमारे १२ लाखांहून अधिक लोकसंख्या वास्तव्य करीत असून त्यात स्थलांतरित लोकांची आणखी भर पडत आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने सुरुवातीला तीन पोलीस ठाणी सुरू केली होती. त्यानंतर, त्यांची संख्या एकामागोमाग वाढत जाऊन आजमितीस ती सहावर पोहोचली आहे. त्यांच्या हद्दीत सरासरी लोकसंख्येची घनता लाखोंच्या घरात असून सुरक्षिततेसाठी सुमारे ४० ते १२० कर्मचारी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ४ ते २० कर्मचारी अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, उपअधीक्षक कार्यालयीन कामकाजाकरिता नियुक्त केल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी काही जण साप्ताहिक सुटी व हक्काच्या रजेवर जात असल्याने दैनंदिन कामकाजाकरिता प्रत्येक पोलीस ठाण्यात सुमारे ३० ते ४५ कर्मचारीच उपलब्ध होत असतात. त्यांना प्रत्येकी १२ तासांच्या दोन पाळ्यांत काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यातच लोकसंख्येच्या तुलनेत १० हजार नागरिकांमागे एका पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्य पार पाडावे लागत असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात कर्तव्यावर असलेल्या मनुष्यबळावरून सुमारे २० ते २५ हजार नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी आहे. राज्य शासनाकडून मार्च २०१४ च्या अध्यादेशानुसार ठाणे ग्रामीण पोलिसांसाठी ४५२ पदे मंजूर झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या तारांकित प्रश्नावर स्पष्ट केले.