शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंचे एक, तर सामंतांचे दुसरेच... करायचे काय?; क्लस्टर की एसआरए, झोपडपट्टीधारक पडले विचारात 

By कमलाकर कांबळे | Updated: August 29, 2023 12:33 IST

विशेष म्हणजे पुनर्विकासास तत्त्वत: मान्यता देत पात्र झोपड्यांचे बायोमेट्रिक करण्याचे आदेशही उद्योगमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

- कमलाकर कांबळे

नवी मुंबई : ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टरच्या माध्यमातून नवी मुंबईतील झोपड्यांचा पुनर्विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात वाशी येथील एका जाहीर कार्यक्रमात केली होती. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सुमारे ४३ हजार झोपडीधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, चार दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नवी मुंबईतील झोपड्यांचा एसआरएच्या माध्यमातून  पुनर्विकास करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे क्लस्टर की एसआरए, अशा संभ्रमात झोपडीधारक पडले आहेत.

विशेष म्हणजे पुनर्विकासास तत्त्वत: मान्यता देत पात्र झोपड्यांचे बायोमेट्रिक करण्याचे आदेशही उद्योगमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. महापालिकेने २००१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, नवी मुंबई  क्षेत्रात जवळपास ४२ हजार झोपड्या आहेत. मागील २२ वर्षांत त्यात लक्षणीय वाढ झाली आहे.  सिडको, वन विभाग आणि एमआयडीसीच्या जागेवर या झोपड्या उभारण्यात आल्या. 

यातील सर्वाधिक झोपड्या एमआयडीसीत आहेत. दिघा, ऐरोली, चिंचपाडा, यादवनग, महापे तसेच नेरूळ येथील शिवाजीनगर या भागात आजही नव्या झोपड्या उभारण्याचा धडाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या धर्तीवर नवी मुंबईतील या सर्व झोपड्यांचा क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. त्यामुळे  झोपडीधारक सुखावले हाेते.

झोपड्यांचे अगोदर सर्वेक्षण करामहापालिकेने २००१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार नवी मुंबईत ४२ हजार झोपड्या आहेत. त्यापैकी १९ हजार झोपड्या पात्र ठरल्या आहेत. त्यानंतर पुन्हा २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्यात आले. सर्वच झोपड्यांचा पुनर्विकास करायचा तर त्यांचे नव्याने सर्वेक्षण होणे गरजेचे असल्याची मागणी झोपडीधारकांकडून होत आहे.

एसआरए योजनेला तत्त्वतः मान्यतामुख्यमंत्री शिंदे यांचे खंदे समर्थक तसेच शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी गेल्या गुरुवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन एमआयडीसी क्षेत्रातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी एसआरए योजना लागू करण्याची मागणी केली. सामंत यांनी त्यास तत्त्वत: मान्यता देऊन पुनर्विकासाच्या कक्षेत असणाऱ्या एमआयडीसीतील ३८ हजार  झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे निर्देश दिले.

मुख्यमंत्र्यांची क्लस्टर आणि उद्योग मंत्र्यांची एसआरए, या दोन्ही योजना झोपडीधारकांची दिशाभूल करणाऱ्या आहेत. केवळ राजकीय हेतूने हे दोन वेगवेगळे निर्णय जाहीर केले आहेत. झोपडीधारकांपेक्षा स्थानिक पुढाऱ्यांचे यात हित अधिक आहे. त्यामुळे झोपडीधारकांचे खरेच हित साधायचे असेल तर झोपड्यांची जागा बाजारभावाप्रमाणे संबंधित झोपडीधारकांना द्या. झोपडीधारक स्वत:च आपापल्या क्षमतेनुसार पुनर्विकास करतील.     - सुधाकर सोनावणे,    माजी महापौर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई