शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सानुग्रह अनुदानामध्ये एक हजाराची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 02:51 IST

महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कायम कर्मचाऱ्यांना २३ हजार व ठोक मानधनावर असलेल्यांना १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कायम कर्मचाऱ्यांना २३ हजार व ठोक मानधनावर असलेल्यांना १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला आहे. स्थायी समितीने मंजूर केलेल्या रकमेमध्ये एक हजार रुपयांची वाढ केल्यामुळे कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाºयांना दिवाळीमध्ये सानुग्रह अनुदान देता यावे, यासाठी अर्थसंकल्पामध्ये १० कोटी २७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. कायम कर्मचाºयांना १७ हजार रुपये व ठोक मानधनावरील कर्मचाºयांना ९५०० रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला होता. सभापती सुरेश कुलकर्णी यांनी सर्व सदस्यांच्या सहमतीने कायम कर्मचाºयांच्या रकमेमध्ये तब्बल पाच हजार रुपयांची वाढ करून २२ हजार रुपये देण्याच्या प्रस्ताव मंजूर केला होता. ठोक मानधनावरील कर्मचाºयांना ९५०० रुपयांची तरतूद होती, त्यामध्ये स्थायी समितीने साडेसहा हजार रुपयांची वाढ करून १७ हजार रुपये अनुदान केले होते.सर्वसाधारण सभेमध्ये किती वाढ होणार याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागले होते. प्रस्तावावर सदस्य काय भूमिका घेणार याची उत्सुकता असल्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांनी प्रेक्षागॅलरीमध्ये गर्दी केली होती. महापौर जयवंत सुतार यांनी कायम व ठोक माधनावरील कर्मचाºयांच्या सानुग्रह अनुदानामध्ये एक हजार रुपयांची वाढ केली आहे. कायम कर्मचाºयांना २३ हजार व ठोक मानधनावरील कर्मचाºयांना १७ हजार रुपये मिळणार आहेत. पनवेल महापालिकेपेक्षा दुप्पट रक्कम पालिका कर्मचाºयांना मिळणार आहे.