शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अकरा रस्त्यांसाठीएक कोटींचा निधी

By admin | Updated: February 11, 2017 04:23 IST

रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. यासाठी अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रातील अधिकारी जबाबदार आहेत

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. यासाठी अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रातील अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका रायगड जिल्हा न्यायालयात गेल्या २० आॅक्टोबर, २०१६ रोजी दाखल केली होती. त्यानंतर काही रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात आली. तर गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ११ रस्त्यांकरिता १ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर केल्याची माहिती अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील यांनी दिल्याचे जनहित याचिका दाखल करणारे येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अजय यशवंत उपाध्ये यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या १ कोटी ७८ लाख रुपयांच्या निधीतून दुरुस्त होणाऱ्या रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत. या रस्त्यांमध्ये अलिबागमधील वायशेत ते रेवस रस्ता, श्रीवर्धन-म्हसळा-लोणेरे(रा.मा.९९) रस्ता, अलिबाग ते रोहा वावे (रा.मा. ९१), पोयनाड ते नागोठणे ( रा.मा. ८७), इंदापूर-पाचाड-महाड-करंजाडी-दापोली (रा.मा. ९७), पाली ते पाटणूस (रा.मा. ९४), कर्जत-मुरबाड ते जव्हार (रा.मा. ७६), गव्हाणफाटा-चिरनेर-सावरोली (रा.मा. १०४), विळे भागाड व तळोजा औद्योगिक क्षेत्र रस्त्यांची सुधारणा, अष्टविनायक श्री क्षेत्र पाली व श्री क्षेत्र महाड रस्त्यांची सुधारणा, रायगड जिल्ह्यातील पर्यटन व ऐतिहासिक स्थळाला जोडणाऱ्या रस्त्यांतर्गत रायगड किल्ला रस्त्याचा सामावेश आहे.सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अजय उपाध्ये आणि किशोर चंद्रकांत अनुभवणे यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत ‘रस्ते बांधणी प्रक्रिया अपूर्ण’ राहिल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्या अहवालाच्या अनुषंगाने रस्त्यांच्या दुरवस्थेस जबाबदार धरून रायगड जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक या सात जणांना प्रतिवादी करून त्यांच्याविरुद्ध येथील जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील यांनी न्यायालयात हजर राहून आपली कैफियत मांडली. (विशेष प्रतिनिधी)