शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयातील वादातून एकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:04 IST

सीबीडी रेल्वेस्थानकाच्या इमारतीमधील कॉम्प्युटर ऐज मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाच्या खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे.

नवी मुंबई : आपसातील भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागात एकावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सीबीडी पोलीसठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये हल्ला झालेल्या व्यक्तीच्या डोक्यावर व शरीरावर जखमा झाल्या आहेत.

सीबीडी रेल्वेस्थानकाच्या इमारतीमधील कॉम्प्युटर ऐज मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाच्या खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे. त्यामध्ये कंपनीच्या एका कर्मचाºयाने दुसºया कर्मचाºयावर दगडाने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. अक्षय शिंगारे असे जखमी कामगाराचे नाव आहे. याच कंपनीतील कामगार श्रीकांत यादव याचे सहकारी महिलेसोबत भांडण सुरू होते. त्यात शिंगारे याने मध्यस्थी करून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर यादव हा त्या ठिकाणावरून निघून गेला होता. संध्याकाळी कार्यालय सुटल्यानंतर यादव याने शिंगारेला फोन करून रेल्वेस्थानकासमोरील पार्किंगमध्ये भेटण्यास बोलावले. त्यानुसार कार्यालयात झालेल्या वादावर चर्चा करून तो मिटवण्यासाठी शिंगारे व इतर सहकारी त्या ठिकाणी गेले.

या वेळी श्रीकांत यादव याने शिंगारे याला आमच्या भांडणात मध्ये का पडलास याचा जाब विचारत झटापट केली. यावरून दोघांमध्ये भांडण झाले असता, यादवने रस्त्यावरील दगडाने शिंगारे याच्या डोक्यात तसेच शरीरावर वार केले. त्यामध्ये अक्षय शिंगारे रक्तबंबाळ झाला असता, यादवने तिथून पळ काढला. यानंतर शिंगारेला जखमी अवस्थेत सीबीडीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.