शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दरवाजाबाहेरूनच ‘ओम नमः शिवाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:19 IST

रायगडमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन : ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त

रायगड जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात कोरोनाचे नियम पाळून साजरा झाला. शासनाने मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याने गुरुवारी सर्व मंदिरांचे दरवाजे बंद होते. त्यामुळे भाविकांनी दरवाजा बाहेरूनच महादेवाचे दर्शन घेतले. बम बम भोलेचा गजर झाला; मात्र शांततेत आणि साधेपणाने महाशिवरात्री साजरी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क कर्जत :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री असल्याने कर्जत तालुक्यातील महादेवाच्या प्रत्येक मंदिरात भाविकांनी गाभाऱ्यात न जाता बाहेरूनच दर्शन घेतले. तालुक्यातील प्रत्येक मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी भाविक उपस्थित होते. बहुतांश मंदिरामध्ये मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच मंदिरांमध्ये शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. बहुतांश ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.कर्जत शहरातील श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. मंदिरात हभप श्रीराम पुरोहित यांचे तीन दिवस कीर्तन ठेवण्यात आले होते. तर महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला हभप दिलीप महाराज राणे यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे श्री कपालेश्वराची महापूजा करण्यात आली. त्यांनतर समीर डोंबे यांच्या हस्ते सपत्निक लघुरुद्ध अभिषेक करण्यात आला. सकाळी महिलांचे सामूहिक शिवलीलामृत पारायण झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्यात दर्शनासाठी मनाई असल्याने बाहेरूनच भाविकांनी दर्शन घेतल्याने होणारी गर्दी टळली. दरवर्षी पुणे येथील तुपे बंधू यांचा सनई चौघड्यांचा सुमधुर संगीत मंदिरात असे यंदा तो नव्हता त्यामुळे अनेक वर्षांपासूनची परंपरा यंदा कोरोनाच्या संकटामुळे खंडित झाली.दरवर्षी सायंकाळी श्री कपालेश्वराची पालखी मिरवणूक ढोल-ताशा पथकाच्या गजरात काढण्यात येते ही परंपरा यंदा खंडित झाली. पालखीचे पूजन करून पालखी मंदिराबाहेर चौकात आणून लगेचच मंदिरात आणण्यात आली. 

कोल्हारे येथे त्रिवेणी संगमावर असलेल्या पांडवकालीन शिवमंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक उपस्थित होते. याशिवाय कर्जत तालुक्यातील सर्वच शिवमंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री साजरी करण्यात आली. कोषाणे, साळोख, तमनाथ, माथेरान, मानिवली, बिरदोले, शेलू, धामोते येथील धनेश्वरी आणि मिरकुटे यांचे खासगी मंदिर, नेरळमधील कुसुमेश्वर मंदिर, निर्माण नगरी येथील शिवमंदिर, मोहाचीवाडी, भडवळ, कळंब, पोही, खांडस, देवपाडी, वंजारपाडा, गुढवण, कशेळे, वारे, कोठिंबे, आंबिवली, मांडवणे, चांदई, कडाव, बीड, देऊळवाडी आदी ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात भक्तांनी मनोभावे दर्शन घेतले. माथेरान येथील पिसरनाथ महाराज तसेच कर्जत शहरातील धापया आणि कपालेश्वर येथील मंदिरात शिवरात्रीनिमित्य भाविकांची उपस्थिती होती. सर्वच ठिकाणी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई