शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या कार्यशैलीने सत्ताधारी बॅकफूटवर

By admin | Updated: June 15, 2016 01:38 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या आक्रमक कार्यपध्दतीने कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची झोप उडविली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कार्यशैलीचा सत्ताधारी

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या आक्रमक कार्यपध्दतीने कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची झोप उडविली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कार्यशैलीचा सत्ताधारी राष्ट्रवादीनेही धसका घेतला आहे. एनएमएमटीच्या घणसोली डेपोचे उद्घाटन आणि हायब्रिड बसचा शुभारंभ करताना राष्ट्रवादीचे नेते पूर्णत: बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले.महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी एनएमएमटीच्या घणसोली डेपोचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्याचे योजिले होते. शिवसेनेने सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयावर आक्षेप नोंदविला होता. नियमानुसार पालकमंत्र्यांच्या हस्ते या डेपोचे उद्घाटन करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार आयुक्तांनी प्रोटोकॉलचा हवाला देत नियोजित उद्घाटन कार्यक्रमात खो घातला होता. त्यानंतर काही दिवसांनी कोणताही गाजावाजा किंवा उद्घाटन न करता व्यवस्थापनाने डेपोचा वापर सुरू केला आहे. सत्ताधाऱ्यांना ही मोठी चपराक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान,हे प्रकरण ताजे असतानाच उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झालेल्या दोन हायब्रिड बसेसचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे केंद्राच्या जेएनएनयूआरए अंतर्गत या दोन बसेससाठी अनुदान प्राप्त झाले आहे. मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बसेस महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. अलीकडेच देशातील पहिल्या दोन हायब्रिड बसेस एनएमएमटीत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचा शुभारंभही तितकाच शानदार होईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. परंतु आयुक्त मुंढे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कोणताही गाजावाजा न करता वाहक आणि एका प्रवाशाच्या हस्ते सोमवारी या दोन बसेसचे उद्घाटन करून टाकले.नवीन मार्गाच्या शुभारंभापासून नामफलकांच्या उद्घाटनापर्यंतच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची सवय जडलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी मात्र कच खाल्ल्याचे दिसून आले.(प्रतिनिधी)प्रवाशाने केले उद्घाटनदेशातील पहिल्या हायब्रिड बसेस नवी मुंबईच्या परिवहन उपक्रमात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे त्याचे उद्घाटनही त्या स्तरावर होणे अपेक्षित होते. मात्र आयुक्त मुंढे यांनी प्रोटेकॉल जपण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर सुधाकर सोनवणे किंवा परिवहन सभापती साबू डॅनियल यांच्या हस्ते या हायब्रिड बसेसचे उद्घाटन करता आले असते. परंतु आम्ही नाही, तर तुम्हीही नाही, या अविर्भावात वावरणाऱ्या सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी वाहक आणि प्रवाशांच्या हस्ते या बसेसचा शुभारंभ करण्याचे फर्मान सोडून पुन्हा एकदा आपला संकुचित बाणा अधोरेखित केला आहे.